बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचार आणि विधानांवरच शिवसेना चालत आहे, अनिल परबांचा फडणवीसांना टोला

यावर यथावकाश योग्य ती उत्तरं दिली जातील," अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parab on Devendra Fadnavis Comment)

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचार आणि विधानांवरच शिवसेना चालत आहे, अनिल परबांचा फडणवीसांना टोला

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकाचं पुढे काय झालं? ते कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला होता. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक होत प्रत्युत्तर दिलं आहे. यावर “आजच्या दिवशी टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. यावर यथावकाश योग्य ती उत्तरं दिली जातील,” अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parab on Devendra Fadnavis Comment on Balasaheb Thackeray death anniversary)

“बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालत आलेली आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर दिली. “हिंदुत्ववादी विचारांशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन,” असे फडणवीस म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. (Anil Parab on Devendra Fadnavis Comment on Balasaheb Thackeray death anniversary)

“बाळासाहेब आमच्यातून गेले असले तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. बाळासाहेब हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालत आहोत,” असेही अनिल परब म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 8 वा स्मृतीदिन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहे. (Anil Parab on Devendra Fadnavis Comment on Balasaheb Thackeray death anniversary)

संबंधित बातम्या : 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI