AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर : रामदास आठवले

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. (Ramdas Athawale On Upcoming Mumbai Municipal Election)

...तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर : रामदास आठवले
| Updated on: Nov 22, 2020 | 4:34 PM
Share

मुंबई : येत्या 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन मुंबईचा’ नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा चंग बाधला आहे. त्यानतंर आता रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेवर पक्षाचा उपमहापौर बसवण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. (Ramdas Athawale On Upcoming Mumbai Municipal Election)

“येत्या काळात मुंबई महानगरपालिकेवर जर भाजपचा महापौर असेल, तर आरपीआयचा उपमहापौर असेल,” असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

“जर येत्या काळात भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. भाजप आणि आरपीआय मिळून शिवसेनेला महापालिकेपासून दूर ठेवू, असेही आठवले यावेळी म्हणाले. तसेच या पार्श्वभूमीवर येत्या काळात मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मोर्चेबांधणी 

नुकतंच मुंबईत भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली . यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीसाठी बुथ स्तरापासून बांधणी करा. राजकारणाचा अभ्यास असलेल्या तरुणांकडे वॉर्डांची जबाबदारी सोपवा, अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या.

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला.

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. ठाकरे सरकारचा माज आम्ही उतरवणार आहोत. जनतेच्या पैशांची लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असाही प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला होता.(Ramdas Athawale On Upcoming Mumbai Municipal Election)

संबंधित बातम्या : 

आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.