चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात, तर काहींचं अस्तित्वासाठी आंदोलन : सतेज पाटील

सतेज पाटील (Satej Patils taunt ) यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात, तर काहींचं अस्तित्वासाठी आंदोलन : सतेज पाटील

कोल्हापूर : गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला. “भाजपचं कोल्हापुरातील दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न आहे”, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. (Satej Patils taunt to Dhananjay Mahadik and Chandrakant Patil)

“चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात. हिंमत असेल तर त्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावं. ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन का करत नाहीत”, असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला.

“काही तरी अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही. तुम्ही काय काम केलं हे जनतेला माहित आहे. दूध उत्पादकांची कणव भाजपला नाही. केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे” असं सतेज पाटील म्हणाले.

आंदोलनाला प्रतिसाद नाही. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. स्वाभिमानीसोबत बोलणं झालं. लवकरच सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. राजू शेट्टींवर आंदोलनाची वेळ येणार नाही, असा विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

धनंजय महाडिकांसह आंदोलक ताब्यात

दरम्यान, कोल्हापूरमध्ये भाजप नेते धनंजय महाडिक, समरजीत घाटगे यांनी रस्ता रोको करुन दूध आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी  धनंजय महाडिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

(Satej Patils taunt to Dhananjay Mahadik and Chandrakant Patil)

संबंधित बातम्या 

Satej Patil | भाजपचं आंदोलन लोकांच्या हितासाठी नाही : सतेज पाटील

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *