विधानसभेला धोबीपछाड, उदय सामंतांची भाजपच्या माजी आमदाराला सेनाप्रवेशाची ऑफर

विधानसभेला ज्या उमेदवाराचा पराभव केला त्याच उमेदवाराला आता पक्षप्रवेशाची ऑफर दिलीये उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 16:29 PM, 13 Jan 2021

रत्नागिरी : विधानसभेला ज्या उमेदवाराचा पराभव केला त्याच उमेदवाराला आता पक्षप्रवेशाची ऑफर दिलीये उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी.. राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशात प्रचाराच्या निमित्ताने बोलताना उदय सामंत यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे तत्कालिन उमेदवार तथा माजी आमदार बाळ माने यांना शिवसेना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिलीय. (Minister Uday Samant Offer To Bjp bal Mane over join Shivsena)

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आलाय. पण रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळीच रंजकता आलीय. रत्नागिरीच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना शिवसेना नेते उदय सामंत यांनी भाजपचे उमेदवार बाळ माने यांचा पराभव केला होता. त्याच बाळ माने यांना आता खुद्द सावंत यांनीच शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली आहे.

आपल्या विरोधातील उमेदवारांवर कुरघोडी करुन राजकीय आखाड्यात त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न अनेक राजकारणी करत असतात. त्याची काही उदाहरणेही राजकीय क्षेत्रातून देता येतील. मात्र रत्नागिरीत प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेल्या माने यांनाच मंत्री सावंत यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा होऊ लागल्या आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने यांचे नेतृत्व आम्ही स्विकारु, असं सांगत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी नेमकी काय खेळी खेळलीय याबद्दल रत्नागिरीच्या नाक्यानाक्यावर चर्चा रंगल्यात. तर भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेनेत जाणार का?, असा सवालही लोकांच्यामधून उपस्थित केला जातोय.

बाळ माने यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणून उदय सामंत खासदारकीसाठी तर इच्छुक नाहीत ना?, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे. उदय सामंत आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळत आहे. पुढच्या लोकसभा पंचवार्षिकला सावंत खासदारकीची निवडणूक लढवणार की काय? अशी चर्चा आता सुरु आहे.

(Minister Uday Samant Offer To Bjp bal Mane over join Shivsena)

संबंधित बातम्या

Uday Samant | मुख्यमंत्री विचारानेच निर्णय घेतील, उदय सामंत यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत