AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे," असेही उदय सामंतांनी नमूद केले. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
| Updated on: Oct 06, 2020 | 12:53 PM
Share

पुणे : “राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाही,” अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

“पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतील,” अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.

“जे 50 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवर सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे,” असेही उदय सामंतांनी नमूद केले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन आम्ही परीक्षा घेतो आहे. युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती, तर आम्ही मेमध्येही परीक्षा घेतली असती,” असेही ते म्हणाले.

ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न

“तसेच अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

“मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे विधिमंडळ कर्मचाऱ्यांवर ‘कुणी घर देता का घर’ म्हणण्याची वेळ

फी न भरल्याने परीक्षेला बसू देण्यास नकार; कल्याणच्या ‘प्रतिष्ठित’ शाळेतील प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.