AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण कांजूरमार्गची नियोजित जागा ही केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्यावरुन आता महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं जोरदार जारकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.

'मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान', कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: Nov 03, 2020 | 2:32 PM
Share

मुंबई: आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, अशी माहितीही मलिकांनी दिली आहे. (Minority development minister Nawab Malik criticizes BJP on Metro car shed)

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण कांजूरमार्गची नियोजित जागा ही केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मेट्रो कारशेडसाठी राज्यानं प्रस्तावित केलेली कांजूरमार्गची जागा ही मिठागाराची असल्याचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं आहे. त्यावर नवाब मलिक यांनी केंद्रावर चांगलीच आगपाखड केली आहे.

‘केंद्र सरकारने 2002 मध्ये मिठागाच्या अनेक जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. ही खासगी जमीन असल्याचा दावा यापूर्वी भाजपनेच केला होता आणि आता केंद्र सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे. भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार केंद्राला योग्य उत्तर देईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

“आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना”

‘कांजूरमार्जगची ती  जागा जर केंद्राची आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. मात्र आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे’, असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.  ‘महाराष्ट्राला कोंडीत पकडायचं आहे तर असे निर्णय होत राहणार, पण आमचं मंत्रिमंडळ सक्षम असल्याचंही महापौर म्हणाल्या.

भाजपचा राज्य सरकारवर हल्लाबोल

लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा घणाघात भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही शेलार यांनी केलाय. तर महाराष्ट्रातील करदात्या जनतेच्या 4 हजार कोटींची उधळपट्टी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. केवळ इगोपोटी किंवा खोट्या स्वाभिमानापोटी हे महाराष्ट्राचे सरकार जनतेचे 4 हजार कोटी वाया घालवत असल्याचा आरोप कदम यांनी केलाय.

काय आहे प्रकरण?

11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते. आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले होते.

संबंधित बातम्या:

लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार, आशिष शेलारांचा घणाघात

हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी

Metro carshed | 4 हजार कोटींच्या उधळपट्टीचा शौक असेल, तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे, राम कदमांची टीका

Minority development minister Nawab Malik criticizes BJP on Metro car shed

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.