मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले

एजॉल (मिझोराम): पाच राज्यांच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत असताना, तिकडे ईशान्येकडील मिझोराममध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लाल थनहवला यांचा दोन मतदारसंघात पराभव झाला आहे. चंफई दक्षिण मतदारसंघात मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचे नेते टीजे लालनुनत्‍लुंगा यांनी धूळ चारली. तर सरचिप मतदारसंघातही ते विजय मिळवू शकले …

मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले

एजॉल (मिझोराम): पाच राज्यांच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत असताना, तिकडे ईशान्येकडील मिझोराममध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लाल थनहवला यांचा दोन मतदारसंघात पराभव झाला आहे. चंफई दक्षिण मतदारसंघात मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचे नेते टीजे लालनुनत्‍लुंगा यांनी धूळ चारली. तर सरचिप मतदारसंघातही ते विजय मिळवू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पराभवासह इथे काँग्रेसचाही पराभव झाला आहे. त्यामुळे ईशान्येकडील एकमेव राज्य काँग्रेसने गमावलं आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मिझोराममध्ये काँग्रेसचं सरकार आहे. लाल थनहवला हेच दहा वर्षापासून मुख्यमंत्रीपदाची कमान सांभाळत आहेत. मात्र त्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे.

मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसची अक्षरश: धूळधाण केली. 40 सदस्य संख्या असलेल्या मिझोराम विधानसभेत आता मिझो नॅशनल फ्रंट अर्थात एमएनएफने सत्ता स्थापनेच्या दिशेने पावलं टाकली आहेत. एमएनएफने जवळपास 25 जागांवर आघाडी घेतली आहे.

मागील 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी 34 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र आता उलट परिस्थिती झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *