AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar : कार्यकर्त्याला हात दाखवून नितीन देशमुख दाखवले, या आरोपावर गोपीचंद पडळकरांच उत्तर काय?

Gopichand Padalkar : विधानभवनाच्या लॉबीमध्ये काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात आपल्या कार्यकर्त्याला हात दाखवून नितीन देशमुख दाखवले असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर झाला आहे.

Gopichand Padalkar : कार्यकर्त्याला हात दाखवून नितीन देशमुख दाखवले, या आरोपावर गोपीचंद पडळकरांच उत्तर काय?
gopichand padalkar
| Updated on: Jul 18, 2025 | 11:09 AM
Share

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बुधवारी जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच काल पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाली. यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलले.

“काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. काल अध्यक्ष महोदयांजवळ जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती. माननीय अध्यक्षसाहेबांना विनंती केली की, माझ्या सहकाऱ्यांजवळून चूक झालेली आहे. त्यांना सक्त ताकीत देऊन. काय कारवाई असेल ती कारवाई करा. तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

माझं त्यावर कुठलही मत नाही

“रात्री उशिरा एफआयआर दाखल झालेला आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावर माझं कुठलही मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे, त्याला कोर्टात सामोरे जाऊ” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘सगळे व्हिडिओ काढा’

जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला नितीन देशमुखांकडे हात दाखवताय त्यावर गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं. “तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. एवढी सगळी गर्दी आहे. आम्ही तिथे कोपऱ्यात होतो. सगळे व्हिडिओ काढा. मी दहा-पंधरा मिनिटे तिथे होतो. आमचे कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत फोटो काढत होतो” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘अख्खा दिवस सभागृहात होतो’

“काल माझी लक्षवेधी होती. अख्खा दिवस सभागृहात होतो. परंतु कामकाजात नऊ लक्षवेधी झाल्या. दहावी माझी लक्षवेधी होती. म्हणाले उद्या होईल. सकाळी 9 वाजता सभागृहात आलोय. तुम्ही सगळं फुटेज काढून बघा. आमचे मंत्रिमहोदय तिथे नव्हते. अर्ध्या तासाची चर्चा लक्षवेधी होणार नाही म्हणून मी निघालो होतो. ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचा आदर करत न्यायालयात बाजू मांडू” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.