AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बांगड्या भरा, साल्यानो आमच्या नादाला लागू नका’, शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली

"मी नगरसेवक ते आमदार झालो तरी मला कोणीही संजू भाऊ म्हणायचे. मला मला मंत्री महोदय म्हणण्यापेक्षा संजू भाऊ म्हटलेले आवडते. या शहरातील बटन ( नशेची गोळी) आणि मटण संपवणार. या शहरात एक धाक असला पाहिजे. गुंड बनून तुम्ही समाज सेवक वावरत असाल तर ते मी संपवणार. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका न करता आपल्याला चांगले काम करायचे आहे" असं संजय शिरसाट म्हणाले.

'बांगड्या भरा, साल्यानो आमच्या नादाला लागू नका', शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली
एकनाथ शिंदे
| Updated on: Jan 21, 2025 | 1:41 PM
Share

“माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जैस्वाल यांनी पाहिला आहे. आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही, पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही. पण कार्यक्रम करेक्ट करतो. काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आहे. आम्हाला बंड केल्यावर गद्दार, पन्नास खोके टीका झाली. लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाही” असं आमदार आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले. “माझं नाव संजय आहे, मला दूरचं कळतं. यांचा जन्म झाला नाही, तेव्हापासून मी काम करतो. मातोश्री मधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारले आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे? आमचा माणूस ज्यांची नाव सांगतो, ते पडतात” अशी नाव न घेता अंबादास दानवे यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली.

“सिल्वर ओकवर तुम्हाला का जावे लागते? कोण आहेत तुमचे ते. अजूनही त्यांची लाचारी संपणार नाही. सकाळी भोंगा वाजतो आणि काही बडबड करतो. शिंदे साहेबांनी मला विश्वासात घेऊनच प्रत्येक निर्णय घेतला” असा दावा संजय शिरसाट यांनी केला. “मंत्री होणार यासाठी मला फोन आला. पण भिती वाटत होती. बायकोला सांगू की नको, पण सांगितले. मंत्री पदाची शपथ घेत असताना हात पाय लटपट कापत होते. शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते, आणि ते म्हणाले करोडोच्या संपत्तीपेक्षा हा दिवस महत्वाचा आहे. रिक्षा वाल्याचे दिवस बदलले” असं संजय शिरसाट म्हणाले.

दुसरी कीड संपवायची आहे असं शिरसाट कोणाबद्दल बोलले?

“मी मंत्री झालो, तर काही जणांच्या पोटात दुखत होते. मेळावा घ्या, वाढदिवस साजरा करा. आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही. आमचा शिवसैनिक अजूनही जित्ता आहे. कसली गुर्मी आणि मस्ती आहे. पालकमंत्री काय असतो दाखवतो. बांगड्या भरा साल्यानो, आमच्या नादाला लागू नका” असा संजय शिरसाट यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांना इशारा दिला. “मी पाच वर्षे पालकमंत्री राहणार आहे. राज्याचे काम जिल्ह्यातून करू. “दादगरीचे जे वारे सुरू आहे, ते संपवायचे आहे. या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे” असं ते म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांचा इशारा होता.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.