जे पवारसाहेबांवर बोलतायत त्यांची वैचारिक पात्रता काय?, आमदार लंके यांनी टीकाकारांना सुनावलं

जे नेते शरद पवारसाहेबांवर आक्षेप घेऊन टीका करतायत, त्यांची वैचारिक पात्रता काय?, असा सवाल आमदार लंके यांनी केला आहे. | Nilesh lanke

जे पवारसाहेबांवर बोलतायत त्यांची वैचारिक पात्रता काय?, आमदार लंके यांनी टीकाकारांना सुनावलं
निलेश लंके, गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:06 PM

अहमदनगर :  जे नेते शरद पवारसाहेबांवर आक्षेप घेऊन टीका करतायत, त्यांची वैचारिक पात्रता काय?, असा सवाल करत ज्या नेत्याने संसदीय राजकारणात 50 वर्षापेक्षा जास्त काळ घालवला आहे त्या नेत्यावर टीका करताना आपण काय बोललं पाहिजे, त्याचं भान भाजप नेत्यांना राहिलेलं नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी दिलं आहे. (MLA Niesh Lanke Reply Ram Shinde And Gopichand padalkar Over Pawar criticism)

जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनावरुन बराच वाद पाहायला मिळाला. शरद पवार यांच्यासारख्या जातीयवादी नेत्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली. तसंच आदल्याच दिवशी त्यांनी पुतळ्याचं अनावरण उरकलं. यानंतर यावरुन बरंच राजकारण रंगलं. असं असलं तरी शरद पवार यांच्या हस्ते मात्र नियोजित अनावरणाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांचं अनावरण प्रसंगीचं भाषणही चर्चेत राहिलं. नव्हे त्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला.

जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांच्या एका वक्तव्यावरुन टीका होऊ लागलीय. याच टीकाकारांना आमदार लंके यांनी सुनावलंय. राजकीय कारकीर्द पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या शरद पवारसाहेबांवर हेतू पुरस्कृत दिशाहीन झालेले लोक टीका करतातय. जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, त्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात असल्याचं लंके यांनी म्हटलंय.

देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याइतका राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास त्यांच्याइतका कोणाचाही नाही. जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्याचबरोबर पूजनीय अहिल्याबाई होळकरांचा सखोल अभ्यास पवारसाहेबांइतका टीकाकारांचा नाही. त्यामुळेराज्यातील सर्व टीकाकारांनी देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमत्त्वावर हेतू पुरस्कृत आरोप थांबवावेत, असं लंके म्हणाले.

शरद पवार यांचं नेमकं वक्तव्य काय?

“अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवारांचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं नाव घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांच्या विधानानंतर राम शिंदे आक्रमक

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवीपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे, असं सूच्त करणारं पवारांचं वक्तव्य होतं. जे अतिशय गंभीर होतं. पवारांची ही गंभीर चूक आहे.

मला वाटत शरद पवार हे राजकारणात आणि लोकशाहीतल अर्धशतक पूर्ण करणारे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या तोंडून हे वाक्य गेलेलं आहे. ते अनावधानाने गेलं असेल किंवा स्लिप ऑफ टर्न झाले असेल मात्र असे वक्तव्य करणे ही गंभीर बाब असून अवमान आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अहिल्याबाईंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं पवारांच्या हस्ते अनावरण

शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या अनावरणाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा लेखाजोखाच शरद पवार यांनी मांडला. अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी करण्यात आल्याचं शरद पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची आठवण पवारांनी करुन दिली.

(MLA Niesh Lanke Reply Ram Shinde And Gopichand padalkar Over Pawar criticism)

हे ही वाचा :

शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम, राम शिंदेंचा हल्लाबोल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.