AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रत्नाकर गुट्टेंचं अजितदादा, थोरात, अशोक चव्हाणांचा चॅलेंज! तर पालकमंत्री धनंजय मुंडेंना इशारा

गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. कारखान्याला ऊस घातल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.

आमदार रत्नाकर गुट्टेंचं अजितदादा, थोरात, अशोक चव्हाणांचा चॅलेंज! तर पालकमंत्री धनंजय मुंडेंना इशारा
| Updated on: Nov 30, 2020 | 2:01 PM
Share

बीड: राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा थेट चॅलेंज दिलं आहे. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. गंगाखेड शुगर साखर कारखान्याला आकसापोटी परवानगी दिली नाही असा आरोप गुट्टे यांनी केला आहे.

गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. कारखान्याला ऊस घातल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.

अजितदादा, थोरात, चव्हाणांना चॅलेंज!

गंगाखेड शुगरला ज्या अटी लावल्या आहेत, त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत? असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सरकारने लावलेल्या अटीनुसार राज्यातील एकही कारखाना सुरु होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना चॅलेंज आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असं आव्हानच गुट्टे यांनी दिलं आहे. (MLA Ratnakar Gutte challenge to ajit pawar and other leader)

राज्यातील कोणत्या कारखान्याने एफआरपीनुसार 15 टक्के व्याज दिलं? कोणत्या कारखान्यानं 15 दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे दिले? असा प्रश्न विचारत आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, नाहीतर तुम्ही राजीनामे द्या, असं गुट्टे म्हणाले. महाराष्ट्रात काही कारखाने विनापरवाना सुरु असल्याचा आरोप करत सिद्धी शुगर आणि अहमदपूर भिमा कारखान्याचा उल्लेख त्यांनी केला.

शरद पवारांना विनंती

गंगाखेड शुगर सुरु झाला नाही तर परिसरातील 7 लाख टन ऊश गाळपाअभावी उभा राहिल, अशी भीती गुट्टे यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. पवार साहेब, आपण देशाचे नेते आहात. आपल्या हातानेच पहिली मोळी टाकली आहे. यंदा कारखाना सुरु करुन आपला वाढदिवस साजरा करा, अशी विनंती गुट्टे यांनी पवारांकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांना इशारा

“ज्यांच्या कुणामध्ये खुमखुमी आहे त्यांनी आपल्यासोबत भांडण करावं. त्यांनी समोर यावं, आपण लढण्यास तयार आहोत. तुम्ही पालकमंत्री आहात. तुमच्या मेहुण्याची जिरवली, तुमचीपण जिरवू”, अशा शब्दात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या:

तुरुंगात असलेल्या रत्नाकर गुट्टेंचा गंगाखेडमध्ये दणदणीत विजय

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना अटक

MLA Ratnakar Gutte challenge to ajit pawar and other leader

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.