AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘..तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचंही कौतुक

राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असं वक्तव्य गडाख यांनी केलंय.

'..तर रक्ताचे पाट वाहिले असते', आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचंही कौतुक
शंकरराव गडाख, माजी मंत्रीImage Credit source: Google
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 11, 2022 | 9:07 PM
Share

अहमदनगर : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगलीय. शिवसेनेचे (Shivsena) तब्बल 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. तर उरलेले 15 आमदार सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यात अपक्ष आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचा समावेश आहे. गडाख यांनी आज अहमदनगरमध्ये जाहीर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचं तोंडभरुन कौतुक केलंय. इतकंच नाही तर राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असं वक्तव्य गडाख यांनी केलंय.

‘बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट वाहिले असते’

शंकरराव गडाख म्हणाले की, उद्धवसाहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तात एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केलीय. असं बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होती. राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं असल्याचं गडाख म्हणाले.

‘माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला’

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आजपर्यंत आपण गोव्यात असं झालं, तिकडे तसं झालं हे ऐकत होतो. मात्र, आपल्या राज्यातही तीच परिस्थिती आली. प्रचंड घालमेल मनात सुरु होती. काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. मी यशवंतराव गडाख यांचा मुलगा असलो तरी माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. मी अपक्ष निवडून आलो तेव्हा तालुक्याच्या हिताचा निर्णय घेईन असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली. ते राजकीय व्यक्ती नव्हते म्हणून मला संधी दिली. हा तालुका भल्या भल्यांना घरी बसवणारा तालुका आहे. भावनिकतेवर चालणारा तालुका आहे.

शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघेच होतो

मला काही आमदारांनी सांगितलं होतं हे सरकार जास्त टिकणार नाही. कारण, ज्यांच्यासोबत लढलो त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले, अखेर स्फोट झाला. मलाही गुवाहाटीवरुन फोन आला होता, अनेक आमदार येणार आहेत तु्म्ही देखील या. त्यावेळी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम काय होईल तो होईल. त्यावेळी गडाखसाहेब उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बोलले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघेच होतो. सर्व घडामोडी सुरु होत्या, मात्र आपण स्थिर होतो, असंही शंकरराव गडाख यांनी सांगितलं.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन