अमित ठाकरेंकडून मध्य रेल्वेची खरडपट्टी, गाड्यांच्या अनियमिततेपासून महिलांच्या सुरक्षेपर्यंत प्रश्न उपस्थित

अमित ठाकरेंनी प्रवासी संघटनेसोबत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांविषयी सुस्त आणि निष्क्रिय झालेल्या प्रशासनाची खरडपट्टी काढली. तसेच त्यांनी गाड्यांची अनियमिततेपासून ते महिला प्रवाशांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर चर्चा केली.

अमित ठाकरेंकडून मध्य रेल्वेची खरडपट्टी, गाड्यांच्या अनियमिततेपासून महिलांच्या सुरक्षेपर्यंत प्रश्न उपस्थित

मुंबई : मध्य रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी प्रवासी संघटनेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांविषयी सुस्त आणि निष्क्रिय झालेल्या प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच गाड्यांची अनियमिततेपासून ते महिला प्रवाशांची सुरक्षितता यासारख्या अशा अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणांसोबतच सुरक्षा रक्षकांमध्येही लवकरात लवकर वाढ करावी अशी मागणी केली. त्याशिवाय दर रविवारी मेगाब्लॉक घेत असूनही सतत ट्रेनची रखडपट्टी होते असा प्रश्न उपस्थित करत मध्य रेल्वेची चांगलंच धारेवर धरलं.

‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी सध्या मध्य रेल्वेची अवस्था झाली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून दर दिवशी मध्य रेल्वे काही ना काही कारणामुळे विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस मध्य  रेल्वे विस्कळीत होते. त्यामुळे अनेकांचा कामावर लेटमार्क लागतो. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरेंनी प्रवासी संघटनेसह रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संदीप देशपांडे यांसह अनेक मनसे नेते उपस्थित होते.

मध्य रेल्वेने रेल्वेस्टेशपासून सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले असतानाही महिला प्रवासी सुरक्षित नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करावी. तसेच मध्य रेल्वे दर रविवारी मेगा ब्लॉक घेते. मात्र त्यानंतर रेल्वे विस्कळीत होते आणि प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होतो. यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेची नेहमी होणारी रखडपट्टी थांबवावी. त्यावर काहीतरी कायमचा तोडगा काढावा अशी मागणी यावेळी केली.

तसेच दिवसेंदिवस मध्ये रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातही सेकेंड क्लासप्रमाणे गर्दी वाढत आहे. असे असेल तर मग फर्स्ट क्लासचा पास काढून उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रेनची विशेषत: महिला ट्रेनची संख्या तातडीने वाढवावी, रेल्वेच्या हद्दीत सीसीटीव्ही बसवावे आणि महिलांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली.

त्याशिवाय सध्या कर्जतच्या पुढील स्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्यात लवकरात लवकर सुधारणा करावी असेही सांगितले. तसेच रेल्वे स्टेशनवर तयार करण्यात आलेले वेटिंग हॉल कायम बंद असतात, मग त्याचा उपयोग काय अशा प्रश्न करत रेल्वे प्रशासनला चांगले खडसावले. रेल्वेत किंवा रेल्वे स्टेशनवर एवढे सीसीटीव्ही लावले आहेत. पण त्याचे मॉनिटर्निंग होत का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विशेष म्हणजे बऱ्याच स्थानकांवर अस्वच्छ पदार्थांची विक्री केले जातात. कधी कधी स्थानकांवर पाणी नसतं त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे त्या समस्या तात्काळ दूर कराव्यात असेही अमित ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच गरोदर महिला या महिलांच्या डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे गर्दीत त्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी गरोदर महिलांना अपंग डबा वापरण्यास परवानगी द्यावी किंवा गरोदर स्त्रियांसाठी विशेष डबा करावा अशी मागणीही यावेेळी अमित ठाकरेंनी केली.

तसेच जर रेल्वे प्रशासनाला महिलांसाठी प्रत्येक स्थानकांवर शौचालय बनवावं नसेल तर आम्ही महिला बचत गटाच्या माध्यामातून शौचालयाची निर्मिती करतो असे सांगत अमित ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाची चांगलीच कान उघडणी केली.

दरम्यान यावर ऑपरेशन मॅनेजर सेंट्रल रेल्वे अधिका शिवाजी सुतार यांनी मॉन्सून खबरदारी म्हणून काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक वर उचलण्यात आले आहेत. तसेच रेल्वे रुळावरुन  घसरण्याच्या घटना कमी झाल्यात असे मनसेच्या प्रश्नांवर उत्तर दिले. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर प्रवाशांचे शिष्टमंडळ नाराज असल्याचे सांगितले. तसेच अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.  तसेच रेल्वेच्या समस्या तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्ष्या आम्ही समस्या घेऊन आलो आहोत त्याकडे लक्ष द्या असे सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *