AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईमपास कशाला म्हणतात माहितीये का, मनसेच्या नेत्याने आदित्य ठाकरेंना सुनावले

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत रोखठोक उत्तर देत टाईमपास म्हणजे काय असतो, हे सांगितले आहे. | Aaditya Thackeray

टाईमपास कशाला म्हणतात माहितीये का, मनसेच्या नेत्याने आदित्य ठाकरेंना सुनावले
aaditya thackeray
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 04, 2021 | 11:29 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) म्हणजे टाईमपास पक्ष आहे, अशी खिल्ली उडवणारे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत रोखठोक उत्तर देत टाईमपास म्हणजे काय असतो, हे सांगितले आहे. (MNS leader Kirtikumar Shinde take a dig at Aaditya Thackeray)

औरंगाबादचं नामांतर करण्यात 30 वर्ष फुकट घालवण्याला आणि मुंबईकरांना प्रत्येक निवडणुकीत चांगले रस्ते, शाळा, बगीचे देऊ, असे आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याला टाईमपास म्हणतात, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या ट्विटसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसेत जुंपण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील हे द्वंद्व आणखीनच वाढण्याची चिन्हे आहेत.

आदित्य ठाकरेंनी काय म्हटले होते?

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी (Shiv Sena Virappan gang) असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून मनसेचा टाईमपास टोळी (MNS Timepass gang) असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी मनसेबाबत विचारणा झाली असता आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

मनसेकडून शिवसेनेचा वीरपन्न टोळी असा उल्लेख

“वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

“मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ”टीव्ही 9 मराठी’शी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं.

संबंधित बातम्या: 

मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं? संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंमध्ये ट्विटरवर जुंपली

…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

(MNS leader Kirtikumar Shinde take a dig at Aaditya Thackeray)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...