अमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी, मंत्रालयात जाताना गाडी फोडू, मनसेची जाहीर धमकी

मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिलीय. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय.

अमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी, मंत्रालयात जाताना गाडी फोडू, मनसेची जाहीर धमकी


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, हे प्रत्युत्तर मनसेच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिलीय. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय. त्यामुळे आता हा वाद पेटणार असं दिसतंय.

जगदीश खांडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं. एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचं काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झालाय का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही.”

“मिटकरी यांना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय, त्यांनी हे गटर बंद ठेवावं”

“मिटकरी यांना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटर बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू. तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करुन जातात, आता जास्त काळ्या काचा करुन जा. नाहीतर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाहीतर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही,” अशी धमकी मनसैनिक खांडेकर यांनी दिली.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर, राज यांच्यावर थेट ‘राष्ट्रद्रोहा’चा आरोप!

“राज ठाकरे जातपात मानत नाही, मग दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला?”

‘राष्ट्रवादीने महाराष्ट्रात जातीचं विष पेरलं, दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करु नये’

व्हिडीओ पाहा :

MNS Jagdish Khandekar threaten NCP MLA Amol Mitkari

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI