शिवसेना स्वतःचा नायलकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष : संदीप देशपांडे

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना काळातील निर्बंधांवरुन राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यातही त्यांनी शिवसेनेला अधिक लक्ष्य केलं. शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष असेल, असं म्हणत घणाघाती टीका केली.

शिवसेना स्वतःचा नायलकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष : संदीप देशपांडे
मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना काळातील निर्बंधांवरुन राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यातही त्यांनी शिवसेनेला अधिक लक्ष्य केलं. शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष असेल, असं म्हणत घणाघाती टीका केली. कोरोनाच्या नावावर लूट माजवणाऱ्यांना दुसऱ्यांच्या संवेदना काय कळणार? असाही सवाल त्यांनी विचारला.

संदीप देशपांडे म्हणाले, “कोरोनाच्या नावावर लूट माजवणाऱ्यांना दुसऱ्यांच्या संवेदना काय कळणार? या व्हिडिओमध्ये मी म्हणतो आहे की वॉर्ड ऑफिसर फोन उचलत नाही. लोकांना बेड मिळत नाही. हे कोणामुळे झालं, तर हे शिवसेनेच्या नालायकपणामुळे झालं. शिवसेना स्वतःचा नालायकपणा इतक्या जोराने दाखवणारा एकमेव पक्ष असेल.”

“टीव्ही 9 च्या पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यूनंतरही चॅनलनं काम केलं, मग सरकार काम बंद का ठेवतं?”

“मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं की दुसऱ्या चॅनेलचं फुटेज न वापरण्याचं तत्त्व सोडून तुम्ही माझ्या संदर्भात बातमी केली. त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या टीव्ही 9 च्या एका पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी तुम्ही चॅनल बंद ठेवला नाही, ही सगळी कामं सोडली नाही. तुमचा बातम्या दाखवायचा व्यवसाय चालू होता. मग सरकार काम बंद का ठेवतं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

“उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही”

संदीप देशपांडे म्हणाले, “एखाद्या माणसाचा दुर्देवी मृत्यू झाला त्याला बेड मिळत नाही, तर दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. यात चुकीचं काय आहे? हे जे ट्रॉल करणारे युवासैनिक आहेत त्यांना ऑल द बेस्ट. त्यांनी मला कितीही ट्रोल करावं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”

“आम्ही या आधुनिक रँडला निवडणुकीत धडा शिकवू”

“1987 मध्ये ज्या पद्धतीने रँडनी लोकांवर अत्याचार केले त्यावेळी ब्रिटिश राज्य होतं. चाफेकर बंधूंनी त्यांच्या पद्धतीने धडा शिकवला, पण या आधुनिक रँडला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता निश्चितपणे धडा शिकवेल,” असंही देशपांडे यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

‘वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून सूट देताय का?’ मनसे नेत्याचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

Amit Thackeray Uncut | कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक

व्हिडीओ पाहा :

MNS leader Sandeep Deshpande criticize Shivsena and MVA for restriction amid Corona in Maharashtra

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI