वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार, मनसे आक्रमक

वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळखट्टाक आंदोलन करणार असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल, असं मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार, मनसे आक्रमक

सिंधुदुर्ग : राज्यात वीजबिल (Elecricity bill) माफी व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. हाच मुद्दा पकडून वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल, असं मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर (Parshuram Uparkar) यांनी सांगितले. (MNS Parshuram Uparkar Warns State Govt over Excessive Elecricity bill)

वीजबिलात 100 युनिटपर्यत माफी देणार असं आश्वासन देऊन ऐन दिवाळीत वीजबिलात माफी मिळणार नाही अशी घोषणा करून जनतेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मनसेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी बैठक झाली. राज्य सरकारला सोमवारपर्यत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर वीजबिल माफीसाठी जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

दुसरीकडे वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन स्वत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचं फोनवरुन सविस्तर बोलणं झालं होतं. गरज पडल्यास या विषयावर मी मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आता चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतीये.

(MNS Parshuram Uparkar Warns State Govt over Excessive Elecricity bill)

संबंधित बातम्या

100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *