भाजपसोबत युती करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेतील; मनसेने वाढवला युतीचा सस्पेन्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 10, 2021 | 3:40 PM

महाविकास आघाडीचं सरकार एकत्र असल्यामुळे मसने आता निवडणुकांमध्ये भाजपला साथ देणार अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

भाजपसोबत युती करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेतील; मनसेने वाढवला युतीचा सस्पेन्स
राज ठाकरे
Follow us

नवी मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांची एकच लगबग सुरू आहे. अशात आता मनसेही मागे नाही. महाविकास आघाडीचं सरकार एकत्र असल्यामुळे मसने आता निवडणुकांमध्ये भाजपला साथ देणार अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. पण मनसे नवी मुंबई मनपा निवडणुक लढणार की कुणासोबत जाणार या बद्दल अद्याप निर्णय गुलदस्त्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच निर्णय घेतील अशी माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. ते नवी मुंबईत एका उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. (MNS Raj Thackeray will decide to form an alliance with BJP said by raju patil)

नवी मुंबई मनपा निवडणुका तोंडावर असताना सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे जनसंपर्क कार्यालयांनी उद्घाटनचा सपाटा लावला आहे. असं असताना यात आता मनसेही मागे नाही. आज मनसे नेते अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थितीत 3 मनसे शाखेचे उदघाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी निवडणुकांविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मनसे एकटी की भाजपची साथ?

या उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजपसोबत निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला असता आम्ही जनतेच्या मनात आहोत मनसेला कुणाच्या कुबड्याची गरज नाही. आम्ही नवी मुंबई मनपा निवडणूक एकटे लढायची की भाजपसोबत जायचं यावर अद्याप चर्चा नाही. राज ठाकरे यावर निर्णय घेतली अशी माहिती राजू पाटील यांनी दिली. यावेळी भाजपसोबत लढायचं की नाही हे राज ठाकरे लवकरच ठरवतील अशी प्रतिक्रिया शालिनी ठाकरे यांनीही दिली. त्यामुळे मनसेनं निवडणुकांबाबत आणखी सस्पेस वाढवला असंच म्हणावं लागेल.

नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजाव अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असल्याचं सांगितलं जात आहे.

अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि आमदार राजू पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 30 ते 35 गाड्यांच्या ताफ्यासह अमित ठाकरे वाशी टोल नाक्यावर आले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताफा बेलापूरकडे रवाना झाला. दुपारी 3 वाजता अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन पार पडलं.

कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

अमित ठाकरे सुमारे तीन तास नवी मुंबईत थांबतील. त्यानंतर तिन्ही शाखांचे उद्धाटन करतील. या तीन तासात ते नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नवी मुंबईतील राजकीय वातावरण, मनसेची तयारी, मनसेचे संभाव्य उमेदवार, पक्षात येऊ शकणारे इतर पक्षाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक आणि निवडणुकीची स्ट्रटेजी आदी विविध बाबींवर अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच अमित यांच्याकडून नवी मुंबईतील समस्यांचा आढावाही घेतला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (MNS Raj Thackeray will decide to form an alliance with BJP said by raju patil)

संबंधित बातम्या:

अमित ठाकरेंच्या हस्ते तीन शाखांचे उद्घाटन; नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

CM Bhandara Visit LIVE | मुख्यमंत्री ‘त्या’ चिमुकल्यांचा पालकांना धीर देणार, पण न्याय मिळणार?

(MNS Raj Thackeray will decide to form an alliance with BJP said by raju patil)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI