प्रतिस्पर्धी उमेदवार शिक्षणसम्राट, राज ठाकरेंकडून रुपाली पाटलांना ‘मनसे’ शुभेच्छा!

रुपाली पाटील यांनी दिवाळी पाडव्याचं निमित्त साधून राज ठाकरे  यांची भेट घेतली.

प्रतिस्पर्धी उमेदवार शिक्षणसम्राट, राज ठाकरेंकडून रुपाली पाटलांना 'मनसे' शुभेच्छा!
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते.
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 3:23 PM

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांना विधानसभेला दिलेला शब्द पाळून मनसेकडून पुणे पदवीधर (Pune Graduate Constituency Election) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याच अनुषंगाने रुपाली पाटील यांनी दिवाळी पाडव्याचं निमित्त साधून राज ठाकरे  यांची भेट घेतली. यावेळी पुण्यातील प्रतिस्पर्धी उमेदवार शिक्षणसम्राट आहेत, असा निशाणा साधत राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना विजयाच्या ‘मनसे’ शुभेच्छा दिल्या. (MNS Rupali patil Meet Raj thackeray)

विद्यार्थी-शिक्षकांचे प्रश्न ते निवडणुकीचा प्रचार यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे-रुपाली पाटील यांच्यात चर्चा झाली. “राजसाहेबांनी पदवीधर मतदारसंघाचा एकंदर आढावा घेतला. पदवीधरांची नोंदणी किती झाली आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, या सगळ्या विषयांची माहिती माझ्याकडून घेतली”,  असं रुपाली पाटील यांनी सांगितलं.

“कोरोना काळात विद्यार्थी-पालक, शिक्षक त्यांचे प्रश्न घेऊन राज ठाकरेंकडे आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना संबंधित प्रश्नांची जाण आहे. आजच्या भेटीत विविध विषयांवर मार्गदर्शन करताना नेमक्या कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा आणि सरकारकडून मागण्या कशा मान्य करुन घ्याव्या”, या विषयांवर चर्चा झाल्याचं रुपाली पाटील यांनी सांगितलं.

इथून पुढच्या काळामध्ये पदवीधर, शिक्षकांसाठी आपल्याला काय करायचंय, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे मला राजसाहेबांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शिष्यवृत्तीपासून अनेक विद्यार्थी वंचित राहतात, त्यासाठी काय पावले उचलणे गरजेचे आहे, हे देखील मला राजसाहेबांनी सांगितलं, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे शिक्षणसम्राट आहेत असं  म्हणत ‘तुला विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खूप काम करायचंय, विजयी हो, अशा शब्दात सरतेशेवटी राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.

2019 च्या विधानसभेला तिकीट न मिळाल्याने रुपाली पाटील नाराजी

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास रुपाली पाटील इच्छुक होत्या. मात्र या ठिकाणी मनसेने अजय शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे रुपाली पाटील नाराज झाल्या होत्या. मात्र पक्षाचा आदेश अंतिम मानून त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला.

पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज

पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सासत्याने भूमिका घेत असतात.

(MNS Rupali patil Meet Raj thackeray)

संबंधित बातम्या

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

पुणे पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.