AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा

"पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, अशी टीका संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर केली

'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा निशाणा
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 04, 2020 | 8:54 AM
Share

मुंबई : ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत. (Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples)

“पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे.

“मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कालच विचारला होता. (Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples)

“सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये, त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. “लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

भाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. याआधी जिम व्यावसायिक आणि वाढीव वीज बिलासाठी मनसेने आंदोलन छेडले आहे.

संबंधित बातम्या :

मंदिरं उघडण्यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे मैदानात, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

मंदिरं उघडण्यात सरकारला आकस का? नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा

(Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray on not opening temples)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.