वरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं

'केम छो वरळी', असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी सरकारच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

वरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं

मुंबई : मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे (Sandeep Deshpande Tweet Worli Situation). त्यामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वरळीकरांना नाहक त्रासाला सोमोरे जावं लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी वरळीतली परीस्थिती दाखवली आहे (Sandeep Deshpande Tweet Worli Situation).

‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी पालिकेच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? – आशिष शेलार

तर मुंबईकरांनी सरकारकडून कुठलीही अपेक्षा ठेवून नये, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. “विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!”

Sandeep Deshpande Tweet Worli Situation

अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा – संजय निरुपम

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही ट्वीट करत मुंबईकरांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. “मुंबईत काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. संपूर्ण शहर आणि आजूबाजुच्या परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे स्टेशन ते रुग्णालयापर्यंत सर्व पाण्यात आहे. आजही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कुठलं अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. घरी राहा, सुरक्षित राहा”, असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगत घरी रहावे – विजय वडेट्टीवार

कालपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहावे. या संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. एनडीआरएफच्या पाच तुकड्या देखील तैनात करण्यात आल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मुंबईत पाणीच पाणी

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परळ, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पूर्व उपनगरात पावसाचा जोर थोडा कमी आहे.

गेले काही दिवस मुंबईत पावसाने विश्रांति घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. दादर, हिंदमाता, सायन, परळ, अंधेरी सबवे सारख्या अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.

वरळी परिसरातहू मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. वरळीतील चाळींमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे बैठ्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळे येथील रहवासी डबे, बादल्या मिळेल साधनाने घरातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत पाणी ओसरणार नाही (Sandeep Deshpande Tweet Worli Situation)

संबंधित बातम्या :

Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *