Breaking : मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्वच महापालिकेत मनसेचं एकला चलो रे; संदीप देशपांडे यांची मोठी घोषणा

आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे.

Breaking : मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्वच महापालिकेत मनसेचं एकला चलो रे; संदीप देशपांडे यांची मोठी घोषणा
Breaking : मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्वच महापालिकेत मनसेचा एकला चलो रे; संदीप देशपांडे यांची मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
विनायक डावरुंग

| Edited By: भीमराव गवळी

Sep 14, 2022 | 10:57 AM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून फेऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजपची महापालिकेत युती होईल असं सांगितलं जात होतं. त्यातच राज ठाकरे यांनी डबे जोडण्याचं काम सुरू झालंय असं विधान केलं होतं. त्यामुळे या तिन्ही पक्षांची युती होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह कोणत्याही महापालिकेत मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही स्वबळावर लढू आणि सर्वच्या सर्व जागा लढू, असं संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी जाहीर करून युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, असं संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. आमचा विदर्भाचा दौरा सुरू होतोय. पक्ष वाढीसाठी हा आमचा दौरा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें