शेतकरी म्हणाला, साहेब महागाई लय वाढली, खासदार दिलीप गांधींचा पारा चढला

अहमदनगर : महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर चांगलेच भडकले. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वारंवार वादग्रस्त वक्तव्याने खासदार दिलीप गांधीचं यावेळंच तिकीट धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यातच पुन्हा एकदा हा प्रकार समोर आलाय. राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन समारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी […]

शेतकरी म्हणाला, साहेब महागाई लय वाढली, खासदार दिलीप गांधींचा पारा चढला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

अहमदनगर : महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर चांगलेच भडकले. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वारंवार वादग्रस्त वक्तव्याने खासदार दिलीप गांधीचं यावेळंच तिकीट धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यातच पुन्हा एकदा हा प्रकार समोर आलाय. राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन समारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. वाचा – खा. दिलीप गांधींना संसदेत तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर नेत्यांचा सवाल

गावातील एका मंदिराजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार दिलीप गांधी यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी केंद्राच्या विविध योजना आणि इतर कामे सांगण्यास सुरुवात केली. त्याचवेळेला या ठिकाणी असलेले गृहस्थ यांनी खासदार गांधी यांचे भाषण थांबवून साहेब तुमचे सरकार आहे, महागाई वाढली आहे, आमची पेन्शनही वाढवा, अशी मागणी केल्यावर खासदार दिलीप गांधी यांना आपला राग अनावर झाला. वाचा – अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?

खासदार साहेबांनी उत्तर दिलं, की “सर्वात जास्त दिलीप गांधींनी मदत केली आहे… ओ नीट बोलायचं हा…शांतपणे बोला.. ही काय पद्धत आहे तुमची… हे म्हणतात महागाई वाढली.. डाळ काय भाव आहे. किती रुपये भाव आहे?” असे प्रश्‍न गांधींनी विचारले. वाचा – नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदी नाराज?

दरम्यान, खासदार गांधींनी भडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंसमोर त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं होतं. एका सभेत दिलीप गांधींना मुंडे समर्थकांनी पंकजांसमोर खडेबोल सुनावले. मुंडे साहेबांचं नाव घेऊ नका, तुम्ही फक्त आश्वासने देता, गेली दहा वर्षे तुम्ही फिरकले नाही, असा सवाल मुंडे समर्थकांनी केला. वाचा – पंकजांसमोर खासदार दिलीप गांधींना मुंडे समर्थकांचे खडेबोल

यानंतर खासदार गांधीही चांगलेच भडकले. आम्हाला माहित आहे तुम्हाला काय लागतंय. कोणाच्या पोटात काय दुखतंय हे आम्हाला माहिती आहे. खासदारांनी गटारीचं काम करायचं का? असा सवाल गांधींनी उपस्थित केला. गांधी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात, यावेळी भरसभेत हा प्रकार घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.