नवनीत राणांच्या हातात धूर फवारणी यंत्र, डास घालवण्यासाठी मनपा कर्मचाऱ्याच्या भूमिकेत

अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा (mp navneet rana) यांनी डास पळवून लावण्यासाठी धूर फवारणी यंत्र हातात घेतले आणि मतदारसंघात धूर फवारणी केली.

नवनीत राणांच्या हातात धूर फवारणी यंत्र, डास घालवण्यासाठी मनपा कर्मचाऱ्याच्या भूमिकेत

अमरावती : अमरावतीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे गटार, नाले तुडुंब भरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार पसरतात. हेच लक्षात घेऊन अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Rana) यांनी डास पळवून लावण्यासाठी काल (31 जुलै) धूर फवारणी यंत्र हातात घेतले आणि मतदारसंघात धूर फवारणी केली. यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणाही (MLA Ravi Rana) सहभागी झाले होते.

अमरावतीत नुकतंच महानगरपालिकेची बैठक पार पडली. यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी धूर फवारणी यंत्र हातात घेतले. त्यानंतर स्वतः विविध विभागात जाऊन नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी साफसफाईचे अभियान सुरु केले. नवनीत राणा यांच्या पावित्र्यामुळे मनपा कर्मचारी खडबडून जागे झाले.

अमरावतीतील महावीर नगर, राजापेठ या भागात नवनीत राणांनी स्वत: औषध फवारणी केली. तर त्यांचे पती रवी राणा यांनी गांधी आश्रम, महाजन पुरा, गडगडेश्वर मंदीर यासारख्या झोपडपट्टी भागात औषधांची फवारणी केली. आपल्या मतदारसंघातील खासदार आणि आमदार अशाप्रकारे औषध फवारणी करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

नवनीत राणा या खासदार झाल्यापासून त्या आपल्या मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले होते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांची मन जिंकण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतात तिफन चालवली होती. काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांशी संवाद साधला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI