AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीराजे उदयनराजेंना उद्याच भेटणार, ना कोल्हापूर, ना सातारा, भेटीचं ठिकाण ठरलं

खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) हे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेणार आहेत.

संभाजीराजे उदयनराजेंना उद्याच भेटणार, ना कोल्हापूर, ना सातारा, भेटीचं ठिकाण ठरलं
Sambhaji Raje Chhatrapati_Udayanraje Bhonsle
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 4:11 PM
Share

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) हे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोर्चाची घोषणा केली आहे. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातून मराठा मोर्चाला (First Maratha Morcha) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे उद्या उदयनराजेंना भेटणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (MP Sambhaji Raje Chhatrapati to meet BJP MP Udayanraje Bhonsle tomorrow at Pune will discuss Maratha reservation Maratha Morcha)

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.

संभाजीराजेंची पत्रकार परिषद

दरम्यान, संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा मोर्चाची रुपरेषा मांडली. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा (First Maratha Morcha) काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ : उदयनराजे

संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.

संभाजीराजेंच्या भेटीगाठी 

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांची गाठीभेटी घेतल्या. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

संबंधित बातम्या 

मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, संभाजीराजेंचा एल्गार, मराठा मोर्चाची दिशा ठरली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.