Sanjay Raut : वाय झेड करून टाकली आहे, मंत्रालयात वेड्यांची जत्रा – संजय राऊत
Sanjay Raut : "फडणवीस यांनी कुंभमेळ्याला जाणाऱ्यांना एक पवित्र साबण द्यावा. कुंभ स्नानात जे काही चाललं आहे, तुम्ही कितीही पाप धुतली तरी ते धुतलं जाणार नाही. गंगा पवित्र आहे, त्यांनी आपले पावित्र्य जपलेले आहे. तिथे संत महात्मे निष्पाप लोक जातात. गद्दार, बेईमान भ्रष्टाचारी यांना वाटत असेल, आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल तर तसं नाही" असं संजय राऊत म्हणाले.

“प्रश्न असा आहे की सरकार काय करतं?. जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस सांगतात, अजित पवार सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. डोंबिवली मध्ये 62 इमारतींवर बुलडोझर चालवला. किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आले, याची जबाबदारी कोणतं सरकार घेणार?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाली. 6500 कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येतात, त्याची वेदना सरकारला होत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“गौतम अदानी यांच्या प्रकल्पासाठी इतकी मेहनत केली जाते, तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तरी लोक बेघर झाली नसती. रवींद्र चव्हाण पळून जात आहेत. लोकांना भेटी देत नाहीत, हा काय प्रकार आहे?” असं संजय राऊत यांनी विचारलं. “तुम्ही मस्साजोग सरपंचांचा विषय घेत आहात, दुसरीकडे 6000 लोकांना बुलडोझर खाली चिरडून मारलं. दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे. 6500 हजार घराच्या प्रकरणांमध्ये कोण राजीनामा घेणार? रवींद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत ते राजीनामा देणार का” असं संजय राऊत म्हणाले. “तिथले सत्ताधारी मंत्री, पालकमंत्री ते राजीनामा देणार का?. त्या भागाचे खासदार कोण आहेत? ते राजीनामा देणार का?. लोक आमच्याकडे येत आहेत, हा विषय सरकारपर्यंत जावा. आम्ही जर रस्त्यावर आलो तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल” असं संजय राऊत म्हणाले.
‘आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे’
“एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे, फडणवीस यांचे आदेश पाळू नका. अशा प्रकारचं आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं. आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे. समांतर सरकार सुरू आहे, प्रति सरकार सुरू असेल तर राजकीय अराजक निर्माण झाले आहे. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस हे मोडून काढणार नसतील, तर हे राज्य अराजकाच्या खालीच ढकललं जाईल. 56, 57 आमदार ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आले भाजपने ते आता सरकारला आव्हान देत आहेत” अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
‘मंत्रालयात वेड्यांची जत्रा’
“त्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे. हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे, मंत्रालयात गोंधळ आहे. प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. Sra म्हाडा मध्ये अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकड देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले, याची माहिती मी उघड करेन” असं संजय़ राऊत म्हणाले.