Mumbai Bank Election: मुंबई बँक निवडणुकीत दरेकरांना झटका? अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

Mumbai Bank Election: मुंबई बँक निवडणुकीत दरेकरांना झटका? अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार!
प्रवीण दरेकर, मुंबई बँक
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 4:59 PM

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासाठी महत्वाची असलेल्या मुंबई बँकेत (Mumbai Bank) शिवेसना आणि राष्ट्रवादी नवी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. मुंबई बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आलीय. तसंच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचंही समजतं. मुंबईत बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यावेळी कोण कुणाच्या पारड्यात मत टाकतं आणि कोण निवडून येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई बँकेवर कोणत्या पक्षाचे किती संचालक?

भाजप संचालक

  • प्रवीण दरेकर
  • प्रसाद लाड
  • विठ्ठल भोसले
  • आनंद गाड
  • कविता देशमुख
  • विनोद बोरसे
  • सरोद पटेल
  • नितीन बनकर
  • अनिल गजरे

राष्ट्रवादी काँग्रेस संचालक

>> संदीप घनदाट >> शिवाजीराव नलावडे >> पुरुषोत्तम दळवी >> विष्णू गंमरे >> सिद्धार्थ कांबळे >> जयश्री पांचाळ >> नंदू काटकर >> जिजाबा पखर

शिवसेना संचालक

  • सुनील राऊत
  • अभिषेक घोसाळकर
  • शिल्पा सरपोतदार

मुंबई बँकेत शिवसेना राष्ट्रवादीचं गणित कसं जुळणार?

>> शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस = 11 संचालक

>> भाजप = 9 संचालक

दरेकरांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे दाखवून मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवली. यामुळे मुंबई बँक व लाखो ठेवीदारांची फसवणूक झाली असून याप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात आम आदमी पक्षाने तक्रार दाखल केली आहे, असे ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

गेल्या दोन दशकांपासून प्रवीण दरेकर नावाचे श्रीमंतह्ण मजूर मुंबई बँक व हजारो ठेवीदारांची फसवणूक करीत असून, त्यांची खरी जागा तुरुंगात आहे, असा दावाही शिंदे यांनी केला.

इतर बातम्या :

‘वरच्या स्थानी कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नाहीत’, शरद पवारांचे भाजपवर शरसंधान

नॉटरिचेबल नितेश राणे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, नितेश राणे इतके दिवस होते कुठे?

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.