मुंबै बँकेला ‘अ’ वर्ग ही विरोधकांना चपराक, संचालक मंडळाला क्लीन चिट, प्रवीण दरेकर यांचा दावा

दिनेश दुखंडे

| Edited By: |

Updated on: Sep 21, 2021 | 8:32 AM

महाविकास आघाडी सरकारने मुंबै बँकेला (Mumbai Bank) लेखा परीक्षणात अ वर्ग देणे ही एका प्रकारे आम्हा संचालक मंडळाला क्लीन चीट आहे, असं मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. सरकारच्या लेखा परीक्षणात 'अ' वर्ग मिळणे हे आमच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर आहे.

मुंबै बँकेला 'अ' वर्ग ही विरोधकांना चपराक, संचालक मंडळाला क्लीन चिट, प्रवीण दरेकर यांचा दावा
pravin darekar
Follow us

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मुंबै बँकेला (Mumbai Bank) लेखा परीक्षणात अ वर्ग देणे ही एका प्रकारे आम्हा संचालक मंडळाला क्लीन चिट आहे, असं मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. सरकारच्या लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळणे हे आमच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली आहे, असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

सगळ्यांना सांगायला आनंद होत आहे की सरकारी लेखा परीक्षणात मुंबै बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला आहे. कोणत्याही बँकेचं मूल्यमापन लेखापरीक्षण वर्गात असते. बँक उत्तम चालत असल्याचे सर्टिफिकेट सरकार देते, त्यात एनपीए कमी, सीडी रेशो कमी, नफा जास्त हे निकष नाबार्ड, सहकार खाते तपासून वर्ग देत असते. ते आम्ही पूर्ण केलेत. ज्या बँकेवर अनेक टीका-टिपण्या, आरोप करण्यात आले ती बँक उत्तम आहे हे संगण्यास आम्हाला आनंद होत आहे.

‘अ’ वर्गसाठी सीडी रेशो मेंटेन करावा लागतो, तो मुंबई बँकेचा 60 आहे. बँकेचा NPA 5 असावा लागतो तो आमचा साडे तीन ते चार टक्के आहे. बॅंक 9 ते 10 कोटीच्या नफ्यात आहे. FD वाढला आहे. कर्ज देणे वाढले आहे. जे निकष आवश्यक त्याची मुंबई बँकेने पूर्तता केली, त्यामुळे बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

हेच माझ्या राजकीय विरोधकांना उत्तर

बँकेला लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला हेच माझ्या राजकीय विरोधकांना उत्तर आहे. माझ्या संस्थेच्या विरोधात विरोधक काय म्हणतात यापेक्षा ऑडिट अहवाल काय म्हणतो हे महत्वाचे. शरीराच्या एक्सरेत कळतं की प्रकृतीत काय गडबड आहे, तसं एखाद्या संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा गाभा असतो. बँकेची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहेत असं ऑडिट रिपोर्ट सांगतो तेव्हा टीकाकारांना उत्तर मिळते. आम्ही कर्जे वसूल केली, एखादे थकले तर तो घोटाळा होऊ शकत नाही ना ! गेली 10 ते 12 वर्षे खूप त्रास झाला आरोप प्रत्यारोप झाले, शेवटी आम्हीही माणसे आहोत. त्याकडे दुर्लक्ष करीत आम्ही काम करत गेलो. राज्यातील तीन-चार उत्तम बँका आहेत, त्यात मुंबै बँक एक आहे. टीकाकारांना चोख उत्तर या अहवालाने दिले आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

तो तर साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार

राज्य सरकारच्या सहकार विभागाने दिलेला ‘अ’ वर्ग ही एकप्रकारे आम्हाला क्लीन चिटच आहे. शेवटी तुम्ही आरोप कशाच्या आधारे करता ? मुंबई बँकेच्या आरोपवर वेगळी चर्चा होऊ शकते. आमच्या विरोधकांनी साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार केला. पण कुठलही गोष्ट सिद्ध केली नाही. मी संचालक झालो त्यावेळी 1200 कोटींची बँक होती. आज 10 हजार कोटींचा टप्पा पार करीत आहे. याचा अर्थ की बँक प्रगती करते, नफ्यात आहे. बँकेची प्रकृती चांगली असल्याचे ते प्रमाणपत्र आहे. राजकीय आरोप विरोधक करीत असतात, त्यांना माझं सांगणं की माझी एखादी संस्था चालवून दाखवा, नफ्यात आणून दाखवा.लोकांना उपयोग होऊ द्या मग कळतं संस्था चालवणं आणि टिकवणे किती अवघड असते, असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिलं.

भ्रष्टाचार आरोप प्रकरणात सी समरी झाली आहे. पोलिसांनी आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. दोन केस होत्या, कोर्टाने त्यातली एक नाकारली एक स्वीकारली. जो बँकेचा ग्राहक नाही, त्याचा संबंध नाही त्याने पिटीशन केलं. त्यामुळे तो विषय कोर्टात गेला. पुढे त्यातही निर्दोषत्व सिद्ध होईल.

निवडणूक बिनविरोध व्हावी

कोव्हिड काळ आहे. लोक त्रस्त आहेत. संचालक मंडळ निवडणुका व्हाव्यात, पुन्हा तो संघर्ष, ते नको असायला हवे. सहकाराच्या प्रांगणात राजकीय जोडे नको म्हणून मी प्रयत्न केलाय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि एकत्रित निवडणूक व्हावी असे म्हटले आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी हा माझा प्रयत्न. कोट्यवधींचा खर्च टाळता येऊ शकतो. गुणा-गोविंद्याने काम होऊ शकते. मुख्यमंत्री याबाबतीत सकारात्मक आहेत, त्यांची सहमती आहे, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

मुंबै बँकेतील बोगस कर्ज प्रकरण पुन्हा चर्चेत, प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळले  

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI