AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?

निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

Best Election Result : ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा, बेस्ट पतपेढीत थेट भोपळा; नेमक्या काय चुका भोवल्या?
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Aug 20, 2025 | 3:55 PM
Share

Best Society Election Result : गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली होती. दोन्ही भावांचं उत्सर्ष पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.

वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडे दुर्लक्ष

बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचणी परीक्षा म्हणून पाहिले जात होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय चमत्कार होऊ शकतो? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र निकालानंतर ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल पराभूत झाल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ठाकर गटच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केला नाही.

महापालिकेत शिवसेना (संयुक्त शिवसेना) अडीच दशके सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. हीच बाब आता ठाकरे गटाला भोवल्याचे म्हटले जात आहे. कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँण्डचा प्रभाव मतदारांवर पडेल, असे ठाकरे गट आणि मनसेने ग्रहित धरले. त्याचा परिणाम निकालावर झाला. आणखी एक बाब म्हणजे उत्कर्ष पॅनेललने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी काही उमेदवारावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच मतभेद होते. हा विसंवाद पतपेढी निवडणुकीत भोवला.

ऐन निवडणुकीत झाले भ्रष्टाचाराचे आरोप

या निवडणुकीत मनसेचे काही वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. मात्र ठाकरेंच्या पक्षाचा एकही वरिष्ठ नेता या निवडणुकीच्या प्रचारात दिसला नाही. ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर या आरोपांची चौकशीही चालू झाली. त्याचा थेट परिणाम मतदानावर पडला. परिणामी ठाकरे-मनसेच्या पॅनेलचा पराभव झाला.

निवडणुकीचा निकाल काय लागला?

बेस्ट पतपेढीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने एकूण 14 जागा जिंकल्या आहेत. तर प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे एकूण सात उमेदवार विजयी झाले आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.