BMC Election 2022 Ward 98 : आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला, वॉर्ड क्रमांक 98 भाजप राखणार?

गेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांना 12 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. तर शिवसेनेची गाडी याठिकाणी अवघ्या 4 हजार मतांवर अडकली होती. तर काँग्रेसनेही फार काही नाही साडेतीन हजार मतांपर्यंत मजल मारली होती.

BMC Election 2022 Ward 98 : आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला, वॉर्ड क्रमांक 98 भाजप राखणार?
आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jun 09, 2022 | 6:57 PM

मुंबई : मुंबईतील सांताक्रझ (Santacruz) भागात भाजप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे या भागात पहिल्यापासूनच भाजपला चांगली मतं मिळाली आहेत. आताही हा गड कायम राखण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यापुढे असणार आहे. कारण मुंबई जिंकायची (BMC Election 2022) जबाबदारी मिळालेल्या नेत्यांमध्ये आशिष शेलार यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. तसेच या वॉर्डमध्ये भाजपच्या पुढाकाराने राबावलेल्या स्थानिक याजनाही गाजल्या आहेत. स्थानिकांना रोजचा भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा मिळावा यासाठी हाऊसिंग सोसायट्यांनी त्यांच्या भागातील निवडून दिलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेत ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे. स्थानिक आमदार आशिष शेलार आणि नगरसेविका अलका केळकर यांनी एक वेळापत्रक तयार केले आहे. ज्याचे वांद्रे, खार आणि सांताक्रूझ (पश्चिम) समावेश असलेल्या एच (पश्चिम) नागरिक फेडरेशनमधील रहिवासी कठोरपणे पालन करत आहेत. संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान भाजीपाल्याचा साठा असलेली व्हॅन नियुक्त केलेल्या ठिकाणी येत होती .

मतांचं विभाजन कसं होतं?

या मतदारसंघातील गेल्यावेळचं मताधिक्य पाहिल्यास भाजपने हा गड सहज जिंकल्याचे दिसून येते. गेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांना 12 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. तर शिवसेनेची गाडी याठिकाणी अवघ्या 4 हजार मतांवर अडकली होती. तर काँग्रेसनेही फार काही नाही साडेतीन हजार मतांपर्यंत मजल मारली होती. एकूण 11 उमेदवार याठिकाणाहून मैदानात उतरले होते. मात्र बाकीच्या उमेदवारांना हजाराचा आकडाही पार करता आला नव्हाता. त्यामुळे मुख्य लढत ही भाजप, शिवसेना, आणि काँग्रेसमध्येच राहिली होती. आता मात्र या मतदारसंघाचं चित्र बदललं आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

भाजपकडून बड्या नेत्यांची फळी

यावेळी महापालिकेसाठी भाजपकडून नेत्यांची मोठी फळी उभा करण्यात आली आहेत. मुंबई महापालिका यावेळी भाजपचीच आहे, असा दावा रोज भाजप नेते करत आहेत. तर मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सध्या त्यांचा सर्व फोकस हा मुंबईवर ठेवला आहे. मुंबई अनेक विकास कामांचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय. तर अनेक कामं ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा शिवसेनेला या निवडणुकीत होऊ शकतो. आता तीन दशकांपासून पालिकेत ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीवरून उतरवण्यात भाजपला यश मिळतं की पुन्हा शिवसेनाच आपला बालेकिल्ला राखणार हे चित्र तर निकालनंतरच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें