AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 BDD Chawl Ward 195 | बीडीडी चाळीवर सेनेच्या भगव्याचा प्रभाव कायम राहणार का? की भाजचं कमळ फुलणार? काय सांगतात वॉर्ड क्रमांक 195 चे मतांचे आकडे?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा मागील वेळच्या तुलनेत अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 195 हा सर्वसाधारण गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. या गटातील इच्छुक आता कामाला लागले आहेत. लवकरच विविध पक्षांतर्फे उमेदवारांची नावं जाहीर होतील.

BMC Election 2022 BDD Chawl Ward 195 | बीडीडी चाळीवर सेनेच्या भगव्याचा प्रभाव कायम राहणार का? की भाजचं कमळ फुलणार? काय सांगतात वॉर्ड क्रमांक 195 चे मतांचे आकडे?
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:02 PM
Share

BMC Election 2022 ward 195| मुंबई: महानगर पालिकेचा बिगुल वाजला असून सर्वच वॉर्डांतील आजी-माजी नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहेत. या काळात विविध भागातील स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनीही नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. आगामी निवडणुकीत या सेवेचं फळ कार्यकर्त्यांना मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal corporation) निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मनपाने प्रभाग रचना जारी करून आरक्षण सोडतही घोषित केली आहे. त्यानुसार, विविध वॉर्डांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. वॉर्ड क्रमांक 195 अर्थात बीडीडी चाळ (BDD Chawl) परिसरातील विविध पक्षांनीही मरगळ झटकली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मागील वेळी या वॉर्डावर शिवसेनेचा प्रभाव दिसून आला होता. भाजपच्या उमेदवाराला धूळ चारत दुप्पट मतांनी शिवसेनेनं विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला नागरिकांनी मतं दिली होती. 2017 मध्ये या वॉर्डातून शिवसेनेच्या संतोष खरात (Santosh Kharat) यांनी निवडणूक जिंकली होती. त्यानंतर बराच काळ उलटला आहे. आपण निवडून दिलेल्या नगरसेवकावर वॉर्ड क्रमांक 195 मधील नाराज आहे की समाधानी आहे, हे लवकरच उलगडेल.

विद्यमान नगरसेवक कोण?

वॉर्ड क्रमांक 195 मध्ये शिवसेनेच्या संतोष खरात यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक जिंकली होती. भाजपच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराजित करत त्यांनी नगरसेवकाची माळ गळ्यात घातली होती. आता 2022मधील निवडणुकीतदेखील शिवसेनेची ताकद प्रभावी ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2017 मधील उमेदवारांना किती मते?

  • अॅड. संतोष नामदेव खरात – शिवसेना- 10,811
  • सुशील सखाराम शीलवंत- भाजप- 4838
  • अजय किशोर शिंदे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 2645
  • इन्सुलकर वनिता वसंत- राष्ट्रवादी काग्रेस- 2603
  • जितेंद्र सुदाम दोडके (जेडी) – भारिप बहुजन महासंघ- 1892
  • NOTA- 228
  • शरद सीताराम शिरिषकर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)- 274
  • एकूण मतदार- 48,576
  • वैध मते- 26,842

वॉर्डातील महत्त्वाचे भाग कोणते?

बीडीडी चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परेल (पश्चिम), तुलसी पाइप रोड, लोढा पार्क आदी भाग हा वॉर्ड क्रमांक 195 मध्ये येतो.

वॉर्डातील लोकसंख्येचं गणित काय?

मुंबई महापालिका निवडणुकीतील लोकसंख्या पाहता 2011मधील जनगणनेनुसार, या वॉर्डात 47 हजार 814 एवढी लोकसंख्या होती. तर वॉर्डातील अनुसूचित जातींची संख्या 8 हजार 754 एवढी होती. अनुसूचित जमातींची संख्या 453 एवढी होती. मध्यंतरी कोरोना काळामुळे देशातील जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 2011मधील जनगणनेपेक्षा सर्वच ठिकाणची लोकसंख्या 10 टक्क्यांनी वाढलेली असू शकते.

वॉर्ड आरक्षित की खुला?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा मागील वेळच्या तुलनेत अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 195 हा सर्वसाधारण गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. या गटातील इच्छुक आता कामाला लागले आहेत. लवकरच विविध पक्षांतर्फे उमेदवारांची नावं जाहीर होतील.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाअॅड. संतोष नामदेव खरात विजयी उमेदवार
भाजपसुशील सखाराम शीलवंत-
राष्ट्रवादी काँग्रेसइन्सुलकर वनिता वसंत-
काँग्रेसअजय किशोर शिंदे-
भारिप बहुजन महासंघजितेंद्र सुदाम दोडके-
अपक्ष / इतर--
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.