BMC Election 2022 Bhandup Complex, Vihar Lake (Ward 103): भाजप पुन्हा आपला गड राखणार!
वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडुप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या भागांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या वार्डामधून भाजपाचे उमेदवार मनोज कोटक विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ संसारे यांचा परभाव केला.

मुंबई : वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडुप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख भागंचा समावेश होतो. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Election) या वार्डामधून भाजपाचे (BJP) उमेदवार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 14063 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ संसारे यांचा परभाव केला. या वार्डात भाजप विरूद्ध शिवसेना अशीच लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे गोपीनाथ संसारे यांना एकूण 6436 मते मिळाली होती. या वार्डामधून अपक्ष उमेदवारांसह एकूण सोळा जणांनी निवडणूक लढवली होती. या वार्डामधून भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, भारिप बहुजन महासंघ अशा जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमदेवार उभे केले होते.
आकडेवारी काय सांगते?
या वार्डामधून एकूण सोळा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या वार्डामध्ये एकूण सात अपक्ष उमदेवारांनी आपले नशीब अजमावले होते. या वार्डात सर्वाधिक मतदान हे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांना झाले. त्यांना एकूण 14063 इतकी मते पडली. मनोज कोटक यांच्यानंतर या वार्डामध्ये दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ संसारे हे राहिले त्यांना एकूण 6436 मते मिळाली होती. या वार्डामधून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार डॉ. आर. आर. सिंह हे होते त्यांना या वार्डात एकूण 3332 मते मिळाली. या वार्डात मनसेचे उमेदवार निलेश पाटील यांना 653 तर राष्ट्रवादीचे उमेदवार मंगेश पवार यांना 781 मते पडली. भारिप बहुजन महासंघाचे उमेवार केशव जोशी यांना अवघ्या 122 मतांवर समाधान मानावे लागले.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या वार्डात भांडुप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख प्रभागांचा समावेश होतो.
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
| भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
| काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
| राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
| मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
| अपक्ष/ इतर |
वार्डात किती मतदान झाले?
वार्ड क्रमांक 103 मध्ये मुंबई महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत एकूण 26904 इतके मतदान झाले. त्यापैकी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना सर्वाधिक 14063 इतके मतदान झाले तर शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ संसारे यांना 6436 मते पडली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. आर. आर. सिंह यांना 3332 मते मिळाली.
भाजपाची मतदार संघावर मजबूत पकड
हा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोज कोटक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मतदानाची एकूण टक्केवारी पाहिल्यास एकट्या मनोज कोटक यांना पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते पडली होती. तर उर्वरित 15 उमेदवारांना पन्नास टक्के मते पडली. त्यामुळे जरी आघाडी झाली तरी देखील भाजपाचाच उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे.
