BMC Election 2022 Shankarwadi Ward 30 : शंकरवाडी वार्ड क्रमांक 30 आता खुला, सर्वज राजकीय पक्ष जोर लावणार

आर साऊथ वार्ड क्रमांक 30 हा 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता खुला झाला आहे. त्यामुळे भाजपच्या लीना पटेल-देहेरकर यांना पुन्हा एकदा त्याच वार्डातून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.

BMC Election 2022 Shankarwadi Ward 30 : शंकरवाडी वार्ड क्रमांक 30 आता खुला, सर्वज राजकीय पक्ष जोर लावणार
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:13 PM

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीचे (BMC Election) पडघम वाजायला सुरुवात झालीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची आरक्षण सोडतही नुकतीच जाहीर झालीय. त्यात अनेक दिग्गजांचे वार्ड आरक्षित (Ward Reservation) झाले आहेत, तर अनेकांचे वॉर्ड सुरक्षित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघाचे चित्रं स्पष्ट झाल्याने वॉर्डाच्या बांधणीसाठी स्थानिक नगरसेवक आणि इच्छुकांना वेळ मिळाला आहे. तसेच ज्यांचे मतदारसंघ (Constituency) आरक्षित झाले आहेत, ते आता नवा मतदारसंघ मिळावा म्हणून जोरदार लॉबिंग करताना दिसत आहेत. आर साऊथ वार्ड क्रमांक 30 हा 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता खुला झाला आहे. त्यामुळे भाजपच्या लीना पटेल-देहेरकर यांना पुन्हा एकदा त्याच वार्डातून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. त्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 30 मधून लीना पटेल देहेरकर यांनी विजय मिळवला होता.

कुणाचा पराभव ?

भाजप नगरसेविका लीना पटेल देहेरकर यांनी 2017 च्या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव केला होता. त्यांनी मनसेच्या मीनल द्विवेदी, काँग्रेसच्या नम्रता कनोजिया, शिवसेनेच्या नम्रता रुहानी आणि अपक्ष मीना गोहील यांना पराभूत केलं होतं.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017 च्या निवडणुकीत कुणाला किती मतं?

  • लिना पटेल देहेरकर – भाजप – 18333
  • द्विवेदी मीनल जितेंद्र – मनसे – 834
  • गोहिल मिना जितेंद्र – 63
  • कनौजिया निर्मला बृजमोहन – काँग्रेस – 1511
  • रुघाणी नम्रता निकुंज – शिवसेना – 3459
  • नोटा – 990

वार्डाची सीमा किती आणि कोणती?

उत्तरेकडून पश्चिम द्रुतगती महामार्ग व दुर्गा मंदिर स्ट्रीटच्या जंक्शनपासून दुर्गा मंदिर स्ट्रीटच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे आकुर्ली रोड ओलांडून वडारपाडा रोड नं 2 पर्यंत. तेथून वडारपाडा रोड नं 2 च्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे तानाजी नगर रोडपर्यंत (राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक). तेथून राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकापासून उत्तरबाजूने पश्चिमेकडे व पुन्हा पश्चिमबाजूने दक्षिणेकडे झोपडपट्टीला लागून मोकळ्या जागेतून पूढे उत्तरबाजूने पश्चिमेकडे झोपडपट्टीच्या पायवाटेने पश्चिमबाजूने दक्षिणेकडे तानाजी नगर रोडपर्यंत. तेथून तानाजी नगर रोडच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत. तेथून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे व पुन्हा उत्तरबाजूने पश्चिमेकडे मोकळ्याजागेतून पुन्हा पूर्वबाजूने उत्तरेकडे अशोक नगर मेन रोडपर्यंत. तेथून अशोक नगर मेन रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे झोपडपट्टीमधून एम डी क्रॉस रोडपर्यंत. तेथून एम डी क्रॉस रोडच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे दादा सावे रोडपर्यंत. तेथून दादा सावे रोडच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे चिताभाई पटेल रोडपर्यंत. तेथून चिताभाई पटेल रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे आकुर्ली रोडपर्यंत. तेथून आकुर्ली रोडच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत. तेथून पश्चिम द्रुतगती महामार्गच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे दुर्गा मंदिर स्ट्रीटपर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात अशोक नगर, पद्मबा नगर या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश होतो.

वार्डाची लोकसंख्या किती?

या वार्डातील एकूण लोकसंख्या 47 हजार 354 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 694, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 699इतकी आहे.

वॉर्ड आरक्षित की खुला?

महापालिका प्रशासनाने 2022च्या पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. त्यात हा वॉर्ड खुला झाला आहे. त्यामुळे लीना पटेल देहेरकर यांना पुन्हा एकदा या निवडणुकीत उभे राहण्याची संधी आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.