AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी मी कशी दिसते हे सांगू नये; प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांना खडसावलं

Priyanka Chaturvedi on Sanjay Shirsat : सौंदर्यामुळे खासदारकी मिळाल्याचा संजय शिरसाट यांच्या दाव्यावर प्रियांका चतुर्वेदी उत्तरल्या; म्हणाल्या...

50 खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी मी कशी दिसते हे सांगू नये; प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांना खडसावलं
| Updated on: Jul 31, 2023 | 9:48 AM
Share

मुंबई | 31 जुलै 2023 : सौंदर्यांमुळे प्रियांका चतुर्वेदी या सौंदर्यामुळे राज्यसभा खासदार झाल्या, असं धक्कादायसक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. संजय शिरसाट यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 50 खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी मी कशी दिसते हे सांगू नये, असं म्हणत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांना खडसावलं आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत संजय शिरसाट यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. संजय शिरसाट यांचे महिलांबाबतचे विचार यातून दिसून येतात, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांचं ट्विट

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे, हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे. ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.

परवा दिवशी ठाकरे गटाचा उत्तर भारतीयांसाठीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात प्रियांका चतुर्वेदी यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणातून प्रियांका यांनी शिंदे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. गद्दारांना माफी नाही, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी ठणकावून सांगितलं. त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी धक्कादायक वक्तव्य केलं.

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

प्रियांका चतुर्वेदी या मुळात काँग्रेसमधून गद्दारी करून शिवसेनेत आल्या आहेत आणि आता त्या आम्हाला गद्दार म्हणत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहू आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभा सदस्य केलं, असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असं संजय शिरसाट म्हणाले. प्रियांका चतुर्वेदी यांनी आम्हाला गद्दार म्हणावं हा मोठा जोक आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणातील महिला वर्गाकडून नाराजीचा सूर आला. तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या टीकेला उत्तर दिलं. सडक्या विचारांचे लोकं अजूनही राजकारणात कसे?, असा सवाल आदित्य यांनी केला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.