आशिष शेलारांचा दावा खोटाच; पण…. शिवसैनिक पत्नी माध्यमांसमोर काय म्हणाल्या?

रमेश वाळूंज यांच्या पत्नीने भाजपाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आशिष शेलारांचा दावा चुकीचा असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे सांगितलंय.

आशिष शेलारांचा दावा खोटाच; पण.... शिवसैनिक पत्नी माध्यमांसमोर काय म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Sep 30, 2022 | 4:34 PM

मुंबईः बँड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना रमेश वाळूंज (Ramesh Walunj) यांनी आपला जीव धोक्यात घातला. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तो भाजपचा कार्यकर्ता होता. हा आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा दावा साफ खोटा आहे, असं वक्तव्य रमेश वाळूंज यांच्या पत्नी कल्पना वाळूंज यांनी केलाय. कल्पना यांनी आज यावर खुलासा करण्यासाठी खास पत्रकार परिषद घेतली. वाळूंज हे जन्मापासून शिवसैनिक (Shivsainik) होते, असं वक्तव्य कल्पना वाळूंज यांनी केलंय.

स्वर्गीय रमेश वाळूंज यांची पत्नी कल्पना यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलार यांनी केलेल्या दाव्याबाबत त्यांनी खुलासा केला.

त्या म्हणाल्या, माझे पती जन्मापासूनच शिवसैनिक होते. ते कामावरून आले की शिवसेना शाखेत जायचे.

ते कधीच भाजपमध्ये गेले नाहीत. त्यामुळे हे खोटे आहे की ते भाजपचे कार्यकर्ता होते, असं वक्तव्य कल्पना यांनी केलं.

आमच्या घरी त्यावेळी उद्धवसाहेब, अनिल परब साहेब येऊन गेले होते. आशिष शेलार आमच्या घरी कधी आले नाहीत… असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.

आशिष शेलार आमच्याकडे आले नाहीत मात्र, रमेश वाळूंज यांच्या निधनानंतर शेलार यांनी 5 लाख रुपयांची मदत केली होती… पण याचा अर्थ असा होत नाही की माझे पती भाजपात होते… अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

रमेश वाळूंज हे कायम, अखेरपर्यंत शिवसैनिकच होते, असं कल्पना यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईवर संकट येतं तेव्हा भाजप कुठे जाते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं होतं.

शेलारांचं ट्विट काय?

 

बँड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात होत्या. तेव्हा रमेश वाळूंज यांनी जीव धोक्यात घातला. या दुर्दैवी घटनेत रमेश यांचा मृत्यू झाला. हा भाजपाचा कार्यकर्ता होता. पण हा आमचा आहे, असे म्हणत शिवसेना त्यांच्याकडे पोहोचली, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

त्यावर रमेश वाळूंज यांच्या पत्नीने आक्षेप घेतला आहे. आशिष शेलारांचा दावा चुकीचा असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे सांगितलंय.

कल्पना वाळूंज काय म्हणाल्या ऐका-

या पत्रकार परिषदेत वाळूंज यांचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं. रमेश वाळूंज यांच्या मुलानेही यावेळी मी मोठेपणी शिवसेनेत जाणार, असं म्हटलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें