AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट खोके दिन तर राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार; शिंदे गट ‘असं’ देणार उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण; आजचा 'दिवस' सत्ताधारी अन् विरोधकही साजरा करणार!

ठाकरे गट खोके दिन तर राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार; शिंदे गट 'असं' देणार उत्तर
| Updated on: Jun 20, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : तारीख होती 20 जून. दिवस होता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा… सगळेच पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या विजयात दंग होते. याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशी घटना घडत होती. शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड केलं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडीचा भाग असणारे, ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे स्वपक्षाचे नेते, आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे राहिले होते.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सूरत गाठली. मग गुवाहाटी, गोवा अन् मग मुंबईमार्गे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.

ठाकरे गट साजरा करणार खोके दिन!

या सगळ्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे ठाकरे गटाकडून या दिवस खोके दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ’50 खोके, एकदम ओके’ ही घोषणा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे. त्यामुळे याचाच धागा धरत ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे.

राष्ट्रवादी गद्दार दिन म्हणून आजचा दिवस साजरा करणार!

राष्ट्रवादीनेही हा दिवस साजरा करायचा ठरवलं आहे. राष्ट्रवादी गद्दार दिन म्हणून हा दिवस साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप महाविकास आघाडीकडून आणि विशेषत: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्याचा आधार घेत राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार आहे.

पुण्यात यासंदर्भात आंदोलन केलं जात आहे. गद्दार दिवस म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे.  खोके ठेवत राष्ट्रवादीकडून शिंदे गटाचा निषेध करण्यात येत आहे.  पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे.

शिवसेनेचं प्रत्युत्तर

शिवसेना खोके दिन तर राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा केला जात आहे. अशातच याला शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. शिवसेना स्वाभिमान दिन म्हणून आजचा दिवस साजरा करणार आहे आणि महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देणार आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 20 जूनला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लोक आग्रहास्तव!, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.