मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये ‘वर्षा’वर एक तास बैठक; शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार?

Devendra Fadnavis and Eknath Shinde Varsha Bungalow Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाली. शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार? याचा आकडा समोर आलाय.

मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये 'वर्षा'वर एक तास बैठक; शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार?
एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 8:26 AM

राज्यात फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि अजित पवार यांचा शपथविधी झाला. खरंतर या दिवशी फडणवीस सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अल्पावधीचा असल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्या दिवशी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी झाला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल याबाबत महत्वाची बैठक पार पडली आहे.

फडणवीस- शिंदेंमध्ये बैठक

काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस आणि शिंदेंमध्ये एक तासभर चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे.

सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 7 डिसेंबरला हे अधिवेशन सुरु झालं. तर आज 9 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे.

येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तसंच 11 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो, असं महायुतीतीलच काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

राहुल नार्वेकर आज पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी

विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. त्याआधी भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. राहुल नार्वेकर यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.