बालेकिल्ल्यातच सुप्रिया सुळेंविरोधात ‘घंटानाद’

बालेकिल्ल्यातच सुप्रिया सुळेंविरोधात 'घंटानाद'

हबारामती : बारामती शहरातील मुस्लिम समाजानं दफनभूमी, समाजमंदिर, उर्दू शाळा इत्यादी विविध मागण्यांसाठी चक्री उपोषण केलं होतं. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी 12 डिसेंबरपूर्वी मुस्लिम समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आश्वासन देऊनही पूर्ण न झाल्यानं आज बारामती नगरपरिषदेच्या समोर मुस्लिम समाजाच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम समाजाच्या मागण्या वेळीच पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दुसरीकडे, याबाबत प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून त्यासाठी शासनाकडेही पाठपुरावा करण्यात आल्याचं मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी सांगितलं आहे.

बारामती शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं दफनभूमी, बहुद्देशीय सभागृह, उर्दू शाळेची इमारत, अल्पसंख्यांक निधी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलकांची भेट घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ही सर्व कामे 12 डिसेंबरपूर्वी मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ही कामे पूर्ण झालेली नसल्यानं आज बारामती नगरपरिषदेसमोर मुस्लिम समाजानं घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. या मागण्यांबाबत प्रशासनानं वेळीच कार्यवाही न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, मुस्लिम समाजानं केलेल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पाठपुरावाही करण्यात आला असून लवकरच ही कामे होतील, असं स्पष्टीकरण मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI