हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? पुन्हा अनिल सोले की महापौर संदीप जोशींना संधी?

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. कारण, विद्यमान आमदार अनिल सोले यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तर महापौर संदीप जोशी यांचेही कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.

हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? पुन्हा अनिल सोले की महापौर संदीप जोशींना संधी?
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 12:41 PM

नागपूर: राज्यातील 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात भाजपकडून यंदा विद्यमान आमदार अनिल सोले (Anil Sole) यांच्याऐवजी नवा चेहरा दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सध्या भाजपमधून महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचं नाव आघाडीवर आहे. जोशी यांनी निवडणुकीची तयारी केल्याचंही बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनंही कंबर कसली आहे. काँग्रेसकडून अभिजित वंजारी (Abhijit Vanjari)यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. गेल्या 5 वर्षांपासून वंजारी पदवीधर निवडणुकीची तयारी करत आहेत.(Nagpur graduate constituency election BJP candidate Sandeep Joshi or Anil Sole)

भाजपचे विद्यमान आमदार अनिल सोले हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर महापौर संदीप जोशी यांनी यापूर्वीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाने त्यांना संकेत दिल्यामुळेच त्यांनी ही घोषणा केल्याचं कार्यकर्ते सांगतात. तर विद्यमान आमदार अनिल सोले यांचे कार्यकर्तेही कामाला लागलेले पाहायला मिळतात. प्रत्यक्ष गाठीभेटींवर सोले यांनी भर दिल्याचं दिसत आहे. त्यामुळं आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पदवीधर मतादरसंघ निवडणूक, 1 डिसेंबरला मतदान

निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

संबंधित बातम्या:

राज्यातही निवडणुकांचा श्रीगणेशा; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला मतदान

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

Nagpur graduate constituency election BJP candidate Sandeep Joshi or Anil Sole

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.