नागपूर विधान परिषद निवडणूक: घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाची रणनिती; 26 नगरसेवक गोव्याला रवाना

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत घोडबाजार होऊ नये, यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला रवाना केले आहे.

नागपूर विधान परिषद निवडणूक: घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाची रणनिती; 26 नगरसेवक गोव्याला रवाना

नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत घोडबाजार होऊ नये, यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला रवाना केले आहे. 26 नगरसेवक रात्री एक वाजता विमानाने गोव्याला रवाना झाले. तर उर्वरित नगरसेवक उद्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

भाजपाची एकहाती सत्ता

नागपूर महापालिकेत भाजपाचे 108 नगरसेवक असून, पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे मतांच्या बाबतीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षापेक्षा भाजपाचे पारडे जड आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला देखील आपले नगरसेवक पळवण्याची भीती असल्याने काँग्रेसने देखील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

निवडणुकीत 556 मतदार

नागपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झालेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. या निवडणुकीत 556 मतदार आहेत. यात सध्या तरी 60 मतांनी भाजपचं पारडं जड आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपकडूनंही दक्षता घेतली जातेय. निवडणूक लढवण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू, आम्ही 400 पेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकू, असा विस भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केलाय. नागपूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीत एकूण 556 मतदार आहेत. यापैकी भाजपकडे 60 मतं जास्त आहेत. मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाने आपल्या 26 नगरसेवकांना गोवा सहलीसाठी रवाना केले आहे.

556 मतदारांपैकी कुठल्या
पक्षाकडे किती मतदार?
पक्ष          मतदार

भाजप   – 314
काँग्रेस   – 144
राष्ट्रवादी   – 15
शिवसेना   – 25
बसप   – 11
विदर्भ माझा   – 17
शेकाप   – 06
पिरीपी   – 06
भरिएम   – 03
एमआयएम   – 01
अपक्ष   – 10
रासप   – 03
प्रहार   – 01
रिक्त  – 02

संबंधित बातम्या 

अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, ट्विटरवरुन खोचक शब्दात टीका

Video : राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटलांची घणाघाती टीका

संधी मिळताच जनता आघाडीला फेकून देईल, चंद्रकांत पाटलांनी केला ठाकरे सरकारचा पंचनामा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI