संजय राठोडांनी जी भूमिका मांडली, तीच आम्हीही सांगतोय, तपास योग्य पद्धतीने : नाना पटोले

संजय राठोडांनी जी भूमिका मांडली, तीच आम्हीही सांगतोय, तपास योग्य पद्धतीने : नाना पटोले
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी झालेले सगळे आरोप फेटाळले. (Nana Patole Comment after Sanjay Rathod Pooja Chavan suicide case)

Namrata Patil

|

Feb 23, 2021 | 4:17 PM

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच आम्हीही सांगतो आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तब्बल 15 दिवसांनंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी झालेले सगळे आरोप फेटाळले. (Nana Patole Comment after Sanjay Rathod Pooja Chavan suicide case)

संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली आहे. तीच भूमिका आम्ही सांगत आहोत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. तो तपास योग्य पद्धतीने होईल. यासाठी मीडिया ट्रायलची गरज नाही, असे नाना पटोले म्हणाले.

संजय राठोड 15 दिवसांनी समोर 

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड  मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

काय म्हणाले संजय राठोड…?

“पूजा चव्हाण हिचा पुण्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझा समाज सहभागी आहे. परंतु महाराष्ट्रात या सगळ्या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे.” असे संजय राठोड म्हणाले.

“मी मागासवर्गीय कुटुंबातून, भटक्या विमुक्त कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे. गेल्या 30 वर्षांचं माझं राजकीय आणि सामाजिक काम उद्धवस्त करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून झालं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं.”

“आपण सर्वजण प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला, मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मी विश्वासाने सांगू शकतो माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सत्य समोर येईल.”

“माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका. तपासातून सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले. तसंच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.”

“गेल्या 15 दिवसांपासून विविध माध्यमांद्वारे जी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला ती आता थांबवा कारण चौकशीतून सगळे काही समोर येईल, अशी कळकळीची विनंती त्यांनी हात जोडून केली.”

माझी, कुटुंबाची आणि समाजाची बदनामी थांबवा

या सगळ्या प्रकरणात माझी, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी झाली ती आता थांबवा. कारण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीतून सगळं काही समोर येईल, असं संजय राठोड म्हणाले. (Nana Patole Comment after Sanjay Rathod Pooja Chavan suicide case)

संबंधित बातम्या : 

“वाटलं होतं राठोड राजीनामा देतील, हा तर सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”, प्रविण दरेकरांचा घणाघात

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें