AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘ची’ मोदींनी देशाला दिले; नाना पटोलेंची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन ची दिले आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे. (nana patole Criticises modi government over corona surge)

‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘ची’ मोदींनी देशाला दिले; नाना पटोलेंची सडकून टीका
nana patole
| Updated on: May 10, 2021 | 6:12 PM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन ची दिले आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी ही टीका केली आहे. (nana patole Criticises modi government over corona surge)

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाची परिस्थीती हाताळण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे, त्यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. 130 कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता 300 कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पुर्ण होणे अवघड आहे. घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहे, असं पटोले म्हणाले.

जनतेला वाऱ्यावर सोडलं

जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘चि’ दिले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

भूतान, रवांडासमोर हात पसरण्याची वेळ

काँग्रेस सरकारांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. 2008 च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले. त्यांनी अवघ्या सात वर्षात भूतान आणि रवांडा यासारख्या देशांसमोर मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आणली, अशी टीका त्यांनी केली.

राऊतांशी सहमत

देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा आहे असे म्हटले आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, असंही ते म्हणाले. (nana patole Criticises modi government over corona surge)

संबंधित बातम्या:

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

एकीकडे मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर

राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!

(nana patole Criticises modi government over corona surge)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.