AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | …तर नवाब मलिक यांना खूर्चीवर राहण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडी कोठडीत आहेत.

Nana Patole | ...तर नवाब मलिक यांना खूर्चीवर राहण्याचा अधिकार नाही : नाना पटोले
नाना पटोले नेमकं काय म्हणालेImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई : आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे. भाजपच्यावतीनं विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आक्रमक आंदोलन केलं आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच्या मागणीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सध्या आरोप आहेत. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, याच्याशी आम्ही सहमत आहोत, असं नाना पटोले म्हणाले. याशिवाय इकबाल मिर्चीकडून भाजपला डोनेशन मिळाल असून भाजप पक्ष विसर्जित करणार का, असा सवाल नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले?

नवाब मलिकांच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. कोर्टानं अगर ते सिद्ध झालं तर निश्चितपणे त्यांना मंत्रिमडळात राहण्याचा अधिकार नाही याच्याशी सहमत आहे. पण, जे काही वर्तन भाजपचं महाराष्ट्रात पाहतोय. कोणावरही आरोप करायचं, दुषित करायचं त्याची बदनामी करायची, हे भाजपकडून राजकारण सुरु आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार असं नाना पटोले म्हणाले.

कोर्टाचा एकदा निर्णय येऊ द्या, नवाब मलिकांचा समजा दाऊदशी संबंध असल्यास त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. पण, तमच्या पक्षाचा आर्थिक व्यवहारामध्ये इकबाल मिर्चीशी संबंध आहे तर तुमचा पक्षचं विसर्जित करणार का सवाल असल्याचं नाना पटोले म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याचं प्रत्युत्तर महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 20 कोटी रुपये कुणाकडून घेतले होते. इकबाल मिर्चीकडून भाजपनं 20 कोटी घेतले होते, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

इतर बातम्या :

आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर

छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक अन्यथा….; राष्ट्रवादी काँग्रेसने दिला हा इशारा

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.