महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू, थोरात आणि पटोलेंची ग्वाही

फक्त महाडच नाही तर कोकणचा विकास झाला पाहिजे ही माणिकराव जगताप यांची धारणा होती. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले परंतु माणिकराव जगताप यांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महाडच्या विकासाचा माणिकराव जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जावू, थोरात आणि पटोलेंची ग्वाही
महाड नगर परिषदेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 6:53 PM

महाड : महाडचा विकास हा ध्यास घेत माणिकराव जगताप हे शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्याच दूरदृष्टीतून ही दिमाखदार वास्तू उभी राहिली आहे. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन होतं, फक्त महाडच नाही तर कोकणचा विकास झाला पाहिजे ही त्यांची धारणा होती. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले परंतु माणिकराव जगताप यांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाड नगरपरिषदेची नवीन वास्तू अत्यंत प्रशस्त व सुंदर असून नगरपालिकेची एवढी दिमाखदार वास्तू दुसरीकडे पहायला मिळणार नाही, असंही पटोले म्हणाले. (Nana Patole’s promise to fulfill Manikrao Jagtap’s dream of Mahad’s development)

महाड नगरपरिषदेची नुतन प्रशासकीय इमारत व संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप, रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, रत्नागिरी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड आदी उपस्थित होते.

‘पंतप्रधानांनी गुजरातला मदत केली पण शेजारचा कोकण दिसला नाही’

पटोले पुढे म्हणाले की, मागील वर्षभरात दोन चक्रिवादळाने कोकणाचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून मदत केली पाहिजे परंतु केंद्र सरकारने मदत केली नाही. शेजारच्या गुजरातला तातडीने एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेली पण पंतप्रधानांना शेजारचा कोकण दिसला नाही. परंतु राज्य सरकारने मात्र कोकणला मदतीचा हात दिला. माणिकराव जगताप हे सतत महाडच्या विकासाचा काम करत राहिले. येथील क्रांती स्तंभ सुशोभित करण्याची त्यांची इच्छा होती. ती पुर्ण करुयात असेही नाना पटोले म्हणाले.

पुराच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा गरजेचा – थोरात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोकणाला दोन चक्रिवादळाचा तडाखा बसला, मोठे नुकसान झाले. परंतु सगळी यंत्रणा कामाला लागली आणि काही तासातच वाहतुक सुरु केली, वीजेच्या तारा, पडलेले खांब उभे केले. सर्व यंत्रणा व सरकार पाठीशी उभे राहिले. महाडला पुराचा नेहमीच फटका का बसतो. याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भातील एक प्रस्ताव तयार करा, सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा करु. महाडच्या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख अशा महान व्यक्तींची ही भूमी आहे. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना मिळालं पाहिजे हा ठराव महाड नगरपरिषदेने करुन एक आदर्श घालून दिल्याचं थोरात म्हणाले.

इतर बातम्या :

Mumbai Drugs Case : नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं ‘सत्यमेव जयते’ !

‘अर्धेच काय संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही’, मलिकांचं फडणवीसांना आव्हान

Nana Patole’s promise to fulfill Manikrao Jagtap’s dream of Mahad’s development

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.