मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास, पिंजऱ्यात राहून राज्य चालत नाही, राणेंचा हल्लाबोल

"मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. पिंजऱ्यात राहून राज्य चालत (Narayan Rane on Saamana interview) नाही"

मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास, पिंजऱ्यात राहून राज्य चालत नाही, राणेंचा हल्लाबोल

मुंबई : “मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. पिंजऱ्यात राहून राज्य चालत (Narayan Rane on Saamana interview) नाही”, असा हल्लाबोल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सामनातील शरद पवार यांच्या मुलाखतीवर केला आहे. नारायण राणे यांनी आज (16 जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंनी सामनामधील शरद पवारांच्या मुलाखतीवर निशाणा साधत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका (Narayan Rane on Saamana interview) केली.

“सत्तेचा दर्प चालत नाही, हे शरद पवार कोणाला बोलत आहेत. मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. पिंजऱ्यात राहून राज्य चालत नाही. शरद पवारांबद्दल मला आदर आहे, मी आदर ठेवूनच बोलतो आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

“एकीकडे कोरोनाचा हाहाःकार सुरु आहे आणि सामनामध्ये ही मुलाखत नेमकी कशासाठी, टीका करायला ? मुलाखतीत राज्याच्या प्रश्नाबाबत तर काही झालं नाही, तीन दिवसांच्या मुलाखतीत काय साध्य केलं ?”, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

“सामना वृत्तपत्रात शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत म्हणजेच राजकारण आहे. आतापर्यंत सामना वृत्तपत्रात शरद पवारांएवढी टीका कुणावरच झाली नव्हती”, असंही नारायण राणे म्हणाले.

“राज्याच्या गंभीर परिस्थितीतून जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच ही मुलाखत आहे. नोकरीला सामना आणि काम पवारांचे ही संजय राऊतांची ख्याती आहे”, अशी टीकाही यावेळी राणेंनी केली.

“ही मुलाखत म्हणजे इतिहास घडवणारी असं संजय राऊत म्हणतायेत, याची कोण दखल घेईल माहित नाही. पण याची दखल शिवसैनिक नक्की घेतील. आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये फरक आहे. पवारांवर सडकून टीका करणारे आता त्यांचे गोडवे गात आहेत”, असंही राणेंनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“हसत खेळत मुलाखत घेणाऱ्यांना राज्याचं काहीच पडलेलं नाही. सर्वाधिक रूग्ण, मृत्यू असतानाही तपासणी मात्र कमी आहे”, असंही राणेंनी सांगितले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“गणेशउत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना अडवू नका, असंही यावेळी राणेंनी सांगितले.

“सत्तेत जाण्यासाठी शिवसेनेने ही बेईमानी केली आहे. निवडून आले भाजपच्या जीवावर, सत्तेत गेले विरोधकांबरोबर. 2014 साली शिवसेनेचे आमदार, खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच निवडून आले आहेत,” असंही राणे म्हणाले.

“बाळासाहेब असते तर कधीच यांच्यासोबत गेले नसते. सामनातूनच उद्धव ठाकरेंवर टीका”, हे मी नाही संजय राऊतच म्हणतात, असं राणे म्हणाले.

“पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचा हे आधीची शिवसेना बोलायची आणि आता पवारांचे विचार आणि त्यांचे कौतुक संजय राऊत करत आहेत”, असंही नारायण राणे म्हणाले.

“बाळासाहेबांचे एक वाक्य आहे, शरद पवार एक मॉडर्न अफजलखान, गाडा त्यांना आणि आता बघा काय सुरू आहे. शरद पवार कोण चोरांचे सरकार आणि गुंडांचे बादशाह अशी टीकाही पवारांवर सामनामधून केली गेली होती”, अशी आठवणही यावेळी राणेंनी सांगितली.

संबंधित बातम्या :

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

Nilesh Rane | चाकरमान्यांची चाचणी करुनचं कोकणात पाठवा, नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Konkan Ganeshotsav | कोकणबाबत प्रशासन-मंत्र्यांमध्ये चर्चा, अन्य कोणाला निमंत्रण नाही, अनिल परबांचं राणेंना उत्तर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *