AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, सेनेविरोधात राणेंचा ‘ओम श्रीगणेशा’, राऊत म्हणाले, ‘हा तर मोदी कॅबिनेटचा अपमान!’

मोदींच्या मंत्रिमंडळात थाटात शपथ घेतलेल्या मराठमोठ्या नारायण राणेंनी आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ओ'म श्रीगणेशा' लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. | Narayan Rane take a charge

'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही', सेनेविरोधात राणेंचा 'ओम श्रीगणेशा', राऊत म्हणाले, 'हा तर मोदी कॅबिनेटचा अपमान!'
नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 1:27 PM
Share

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळात थाटात शपथ घेतलेल्या मराठमोठ्या नारायण राणेंनी (Narayan Rane) आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला. तर ‘शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे’, अशी पहिली प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलीय. (Narayan Rane Slam CM uddhav Thackeray Sanjay Raut Firts reaction on Rane in Modi Cabinet)

राणेंनी पदभार स्वीकारला

2019 साली केंद्रात बहुमताने सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. अगदी पहिल्या क्रमांकाला राणेंनी मोठ्या थाटात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राणेंकडे लघु आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी, शहा आणि नड्डांचे पुन्हा एकदा आभार मानले. तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आज्ञेने महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी काम करेन, असा विश्वास जनतेला दिला. यावेळी त्यांनी चांगल्या कामाची सुरुवात म्हणून नोंदवहीत ओम श्रीगणेशा लिहिलं. अधिकाऱ्यांकडून खात्याची विस्तृत माहिती घेतली.

मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खरं खोटं येणारा काळ सांगेल, पण त्याची झलक राणेंनी पदभार स्वीकारताच दाखवली. राणे म्हणाले, “माझं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केलं, चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केलं आणि चांगलं काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही”, असा एकेरी वार राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणेंनी हा वार केला.

राणेंच्या मंत्रिपदावर शिवसेनेची प्रतिक्रिया, ‘थोडी खुशी थोडा गम’

राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर राऊतांनी राणेंचं अभिनंदन करत, महाराष्ट्राच्या नेत्याला मंत्रिपद मिळाल्याने आम्हालाही खुशी असल्याचं दाखवलं. पण दुसऱ्या बाजूला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचा टोकदार बाणा दाखवून दिला.

राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत, असं खुशीवालं उत्तर पहिल्यांदा दिलं…  तर ‘शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे’, असं मनातील उत्तर राऊतांनी दिलं.

(Narayan Rane Slam CM uddhav Thackeray Sanjay Raut Firts reaction on Rane in Modi Cabinet)

हे ही वाचा :

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, पण त्यांची उंची मोठी, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.