राऊत हे जळणारं लाकूड…गाढवालाही अक्कल पण… नरेश म्हस्के राऊतांवर संतापले, म्हणाले…
रायगडमध्ये असताना केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी भाष्य केले.

Naresh Mhaske Vs Sanjay Raut : रायगडमध्ये असताना केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी भाष्य केले. त्यांच्या याच भाषणाचा आधार घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शाहा यांच्यावर सडकून टीका केली. अमित शाहांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला, असं राऊतांनी म्हटलंय. यावरच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांना चांगलंच घेरलंय. संजय राऊत हे जळणारे लाकूड आहेत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा…
“संजय राऊत यांच्या वरून खालून धूर निघतोय. राऊत हे जळणारे लाकुड आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींवर ते जळत आहेत. राऊत यांच्या वरून धूर निघतोय, खालून धूर निघतोय. राऊत यांनी जे वक्तव्य केलंय, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. नेहरू, गांधी घराण्याने नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विरोध केला. नेहमीच त्यांनी विचाराचा विरोध केला. त्या नेहरू ,गांधी घराणेशाहीशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. सत्तेसाठी त्यांनी ही हातमिळवणी केली आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला. तसेच माझा शिवाजी राजा अशा पद्धतीने आपण बोलतो. माजी आई अशा पद्धतीने आपण बोलतो. त्यात आईचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान होतो का ? आपल्या जवळच्या नात्यांमुळे आपण अशा पद्धतीने बोलतो, असे स्पष्टीकरणही म्हस्के यांनी दिले.
हा अधिकार त्यांनी केव्हाच…
औरंगजेबाबद्दल बोलताना समाधी असं म्हटल्यामुळे त्यांना राग आला आहे. मात्र जेव्हा संसदेमध्ये औरंगजेबची कबर उखडून टाका, संरक्षण काढून टाका, असं म्हटलं जात होतं तेव्हा त्यांनी औरंगजेबाबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं. निवडणुकीच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे हे संजय राऊत आणि उ.भा.ठा आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल प्रेम व्यक्त करतात. हा अधिकार त्यांनी केव्हाच गमावलेला आहे, असा हल्लाबोलही नरेश म्हस्के यांनी केला.
गाढवालादेखील अक्कल आहे पण…
तहव्वूर राणाला भारतात आल्यानंतर तुम्ही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करता. गाढवालादेखील अक्कल आहे. पण तुमची अक्कल कुठे गेली. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जाणारे नेतृत्त्व आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचे काम अमित शहा यांनी केलेले आहे. काश्मीर मध्ये 370 कलम रद्द व्हावं ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे जळायचं कमी करा, असा सल्लाही नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना दिलाय.
