शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

"मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन" असे खासदार हेमंत गोडसे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

नाशिक : शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे यांनी आपल्या ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे खासदार आहेत. (Nashik Shivsena MP Hemant Godse tested COVID Positive)

“आज माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.!” असे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे.

“मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या !” असेही गोडसे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

“आता कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणे गरजेचे असल्याने माझे काम सुरु होते.” अशी माहितीही गोडसेंनी दिली.

हेमंत गोडसे 2014 पासून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषद, नाशिक महापालिका यातही पदे भूषवली आहेत.

याआधी कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनाही कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

(Nashik Shivsena MP Hemant Godse tested COVID Positive)

Published On - 10:45 am, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI