AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील : प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकुर यांनी महात्‍मा गांधींचा हत्यारा नथूराम गोडसे देशभक्त असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. काँग्रेसने या वक्तव्यांचा जोरदार विरोध करत भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. आगर […]

Video: नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील : प्रज्ञा ठाकूर
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

भोपाळ : भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकुर यांनी महात्‍मा गांधींचा हत्यारा नथूराम गोडसे देशभक्त असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. काँग्रेसने या वक्तव्यांचा जोरदार विरोध करत भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

आगर मालवामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत, आहेत आणि राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आधी स्वतःला तपासावे. या निवडणुकीत नथुराम यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता उत्तर देईल.” ठाकूर यांच्या या भूमिकेनंतर भाजपची कोंडी झाली आहे. मात्र, थेट याविषयावर माफी मागण्यास भाजपकडून टाळाटाळ होताना दिसत आहे.

नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीत महात्मा गांधी प्रार्थनेवरुन परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधीही गांधींच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले होते आणि काही प्रयत्नांमध्ये स्वतः नथुराम सहभागी होता, असे मत अनेक इतिहासकारांनी नोंदवलेले आहे.

प्रज्ञा ठाकूर 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. त्या स्फोटात 6 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. आरोपपत्रानुसार स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल प्रज्ञा ठाकूर यांची होती.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल काय म्हणाली होती प्रज्ञा ठाकूर?

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. तुझा सर्वनाश होईल, असं मी करकरेंना म्हटलं होतं. मी जेव्हा तुरुंगात गेले तेव्हापासून मला सूतक लागलं होतं. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं.

प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मक्कल नीधि मैयम पक्षाचे अध्‍यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर नथुराम गोडसेबाबतच्या चर्चेला उधाण आले. हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना म्हटले होते, “भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे आहे. येथूनच याची सुरुवात झाली. मी आज गांधींच्या हत्येचे उत्तर शोधण्यासाठी येथे आलो आहे. मी असं मुस्लीम बहुल भागात असल्याने म्हणत नाही, तर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा असल्याने म्हणत आहे. आजचा भारत समानतेवर आधारीत भारत आहे. मी एक चांगला भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”

हसन यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष तमिलिसाई सौंदरराजन ट्विट करत म्हणाले, “आता गांधींच्या हत्येच्या घटनेवर बोलणे आणि त्याला हिंदू दहशतवाद म्हणणे निंदनीय आहे.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.