AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरातील ED कार्यालयांबाहेर काँग्रेसचे आंदोलन, राहुल-सोनिया यांच्यावरील आरोपपत्राने काँग्रेस कार्यकर्ते संतापले

राजकीय सूडबुद्धी म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्ष त्याचा जोरदारपणे सामना करेल असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे उद्या ( बुधवारी ) देशभर ईडी कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

देशभरातील ED कार्यालयांबाहेर काँग्रेसचे आंदोलन, राहुल-सोनिया यांच्यावरील आरोपपत्राने काँग्रेस कार्यकर्ते संतापले
National Herald chargesheet: Congress protests outside ED offices across the country
| Updated on: Apr 15, 2025 | 10:54 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सह त्यांच्या कौटुंबिक सदस्यांवर ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे याचा निषेध प्राणपणाने करण्यासाठी उद्या काँग्रेसचे कार्यकर्ते देशव्यापी आंदोलन करणार आहेत. देशात जेथे ईडीची कार्यालये आहेत तेथे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भातील सर्व प्रदेश काँग्रेस समितीच्या सर्क्युरल जारी करीत उद्या बुधवारी होणाऱ्या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची जमाव जमव करण्यास सांगितले आहे.

‘आप आपल्या राज्यात ED च्या कार्यालया बाहेर निदर्शने करा

काँग्रेसच्या प्रदेश समितींनी आपापल्या राज्यातील ईडी ( सक्तवसुली संचालयाच्या ) कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमवून निदर्शने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.काँग्रेसला राजकीय हेतूने निशाणा बनवले जात असून याचा पक्ष मोठ्या धैर्याने सामना करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

 EDची चार्जशीट काय ?

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग केसमध्ये ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या ओव्हरसिज प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या विरोधात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात प्रॉसिक्युशन कम्प्लेंट ( चार्जशिट ) दाखल केली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्रात सुमन दुबे आणि अन्य लोकांची नावे देखील सामील केली आहेत.

64 कोटींची रुपयांची संपत्ती जप्त

चार्जशिटवर आता कोर्टाकडून दखल घेण्याची पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवली आहे. या प्रकरणात आधीच ईडीने ६४ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ईडीद्वारा राहुल, सोनिया गांधी आणि अन्य लोकांच्या विरोधात PMLA च्या कलम ४४ आणि ४५ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यात आरोपींनी कलम ३ नुसार मनी लॉड्रींगचा गुन्हा केला आहे.

ईडीला आदेश दिले आहेत की तक्रार आणि संबंधित कागदपत्रांची चांगल्या प्रतीची कॉपी आणि ओसीआर (रीडेबल) प्रत पुढच्या सुनावणीच्या आधी दाखल करावी. काँग्रेसच्या नेत्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह करीत केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?